Marathi News> मनोरंजन
Advertisement

करणी सेनेचा पद्मावत सिनेमाला विरोध कायम

सेन्सॉरने जरी सिनेमाला हिरवा कंदिल दाखवला असला तरी करणीसेनेने सिनेमाला विरोध कायम ठेवला आहे. अगदी काहीही झालं तरी हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा पवित्रा करणी सेनेने घेतला आहे.

करणी सेनेचा पद्मावत सिनेमाला विरोध कायम

मुंबई : सेन्सॉरने जरी सिनेमाला हिरवा कंदिल दाखवला असला तरी करणीसेनेने सिनेमाला विरोध कायम ठेवला आहे. अगदी काहीही झालं तरी हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा पवित्रा करणी सेनेने घेतला आहे.

सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' या सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. 

हा सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचं तरण आदर्श यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे 'पद्मावत'ची आता खिलाडी कुमारच्या पॅडमॅन बरोबर बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.

चित्रपटाला सेन्सॉरचा हिरवा कंदील

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपटाला सेन्सॉरने हिरवा कंदील दिल्यानंतर हा सिनेमा प्रदर्शित कधी होणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या. 

आता सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली असून 25 जानेवारीला बॉक्स ऑफिसवर या वर्षातला सगळ्यात मोठा महासंग्राम रंगणार आहे.

Read More