Marathi News> मनोरंजन
Advertisement

'झी रिअल हिरोज' अवॉर्ड्स 2024: कार्तिक आर्यन ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

कार्तिक आर्यनला त्याच्या अभिनयाच्या अनोख्या शैली आणि चारित्र्यामुळे चित्रपटसृष्टीत एक खास स्थान मिळालं आहे. त्याच्या नैसर्गिक आकर्षणासोबतच त्याचा सहज आणि चटकदार अभिनय त्याला प्रेक्षकांच्या हृदयात कायमचा ठसा उमटवणारा ठरला आहे. 

'झी रिअल हिरोज' अवॉर्ड्स 2024: कार्तिक आर्यन ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

कार्तिक आर्यन सहजगत्या आकर्षणामुळेच तो चाहत्यांसोबत एक मजबूत भावनिक बंध निर्माण करण्यास यशस्वी झाला आहे, ज्यामुळे त्याला केवळ एक अभिनेता म्हणूनच नाही, तर एक व्यक्ति म्हणूनही त्याच्या चाहत्यांनी प्रेम दिलं आहे. ज्येष्ठ दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये दिसलेल्या त्याच्या अभिनयाने त्याला बॉलिवूडमधील प्रमुख कलाकारांमध्ये स्थान मिळवून दिलं. 2011 मध्ये 'प्यार का पंचनामा' सारख्या चित्रपटाने तो चर्चेत आला, पण याच्या नंतरच्या चित्रपटांनी त्याला मोठ्या प्रमाणावर यश दिलं. 'सोनू के टीटू की स्वीटी', 'लुका छुप्पी', 'पती, पत्नी और वो' आणि 'भूल भुलैया 2' यासारख्या हिट चित्रपटांमुळे तो लोकांच्या मनात स्थानापन्न झाला. त्याची विनोदी अदा, आकर्षक पर्सनालिटी आणि जबरदस्त संवादामुळे त्याला चाहते कायम लक्षात ठेवतात.

2024 मध्ये त्याने दाखवलेल्या अभिनयाच्या विविधतेने त्याला एक परिपूर्ण अभिनेता बनवलं आहे. त्याच्या 'चंदू चॅंपियन' चित्रपटाने कार्तिकला एक गंभीर आणि कठीण भूमिका साकारण्याची संधी दिली. या चित्रपटात त्याने एका अत्यंत भावनिक आणि जटिल पात्राची भूमिका साकारली, ज्यामुळे त्याच्या अभिनयाची नवी उंची दिसली. कार्तिकने सिद्ध केलं की तो केवळ हलक्या विनोदी भूमिकांमध्येच नाही, तर गहन, गंभीर नाटकातही उत्कृष्ट काम करू शकतो. 

हे ही वाचा: अनुष्का विराट अखेर झाले 'अलिबाग'कर; लवकरच करणार गृहप्रवेश, आलिशान फार्महाऊसमध्ये तयारी सुरु

त्याच्या अभिनयाची पद्धत पाहताना हे लक्षात येतं की, तो प्रत्येक भूमिकेत वेगळा दिसतो आणि त्यात जीवंतता आणतो. त्याच्या चित्रपटांमधील हलक्या विनोदी आणि गडबडपटातील नायकाच्या भूमिकांना त्याच्या चाहत्यांनी खूप पसंद केलं. त्याची सहजता, त्याच्या संवादांसोबतची टायमिंग यामुळे तो सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी एक लोकप्रिय कलाकार बनला आहे.

सिद्ध झालं की कार्तिक आर्यन केवळ एक लोकप्रिय चेहरा नाही, तर त्याच्याकडे अभिनयाची एक नवी दिशा आहे. त्याचा अभिनय कधी नवा, कधी हास्यदायक, कधी गंभीर आणि कधी प्रेरणादायक असतो. त्याच्या अदा आणि विशेष शैलीमुळे तो आता एक फिल्म इंडस्ट्रीचा मुख्य अभिनेता बनला आहे, जो आगामी वर्षांमध्ये अनेक नवे प्रयोग करणार असल्याची शक्यता आहे. 

Read More