Kartik Aaryan and Sreeleela's Romantic Photo : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा गेल्या काही दिवसापासून त्याचा आगामी चित्रपट 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' ला घेऊन चर्चेत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन हा 'पुष्पा 2' या चित्रपटातील किसक या गाण्यातून लोकप्रियता मिळवलेली श्रीलीलासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्या दोघांचे चाहते उस्तुक आहेत. याचं कारण म्हणजे त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. या सगळ्यात आता कार्तिकनं श्रीलीलासोबत त्याचे काही रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून सगळे त्यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत.
कार्तिक आर्यननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रीलीलासोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कार्तिक आणि श्रीलीला दार्जिलिंगमध्ये दिसत आहे. दोघं एका गार्डनमध्ये बसले आहेत. कार्तिक फोटोत श्रीलीलाकडे एकटक पाहताना दिसतो. तर श्रीलीला तिचं तोंड लपवत लाजल्याचे दिसते. या दरम्यान, कार्तिकचा रग्ड लूक पाहायला मिळाला. त्याची दाढी आणि केस खूप लांब दिसत आहेत. तर श्रीलीलानं गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यात ती खूप सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करत कार्तिकनं कॅप्शन देत लिहिलं की 'तू मेरी जिंदगी है'
हेही वाचा : अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक! कास्टिंग काऊचला बळी पडली?
कार्तिक आर्यन आणि श्रीलीलाच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट करत आहेत. त्यावर कमेंट करत जास्त लोकांनी या जोडीची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'मी तुम्हाला दोघांची या चित्रपटातील केमिस्ट्री पाहण्यासाठी खूप उत्साही आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आता आशिकीची प्रतीक्षा करू शकत नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हे हिट आहेत.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'आणखी एक ब्लॉकबस्टर तयार आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, हे संपूर्ण गाणं पाहण्यासाठी मी खूप उस्ताही आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, 'श्रीलीला आणि कार्तिकनं एकत्र काम करावं अशी माझी नेहमीच इच्छा होती.' दरम्यान, कार्तिक आर्यन आणि श्रीलीलाचा 'आशिकी 3' हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे.