Marathi News> मनोरंजन
Advertisement

पडद्यावर सोनू-टीटू यांची जोडी पुन्हा झळकणार

मैत्री हे एक असं नातं आहे जे कधीही शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही.

पडद्यावर सोनू-टीटू यांची जोडी पुन्हा झळकणार

मुंबई : मैत्री हे एक असं नातं आहे जे कधीही शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. मित्रासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालण्यासाठी तत्पर असलेले अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये साकारण्यात आले आहेत. जय-विरू यांची जोडी तर आजही प्रत्येकाच्या मनात आहे. त्याचप्रमाणे अभिनेता कार्तिक आर्यन आणि सनी सिंग यांच्यातील घट्ट मैत्री पडद्यावर चांगलीच गाजली. 

'सोनू की टीटू का स्विटी' या चित्रपटातील हे दोन मित्र पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. फक्त ३० कोटींमध्ये साकारण्यात आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तब्बल १५० कोटी रूपयांचा आकडा पार केला. 

कार्तिक आर्यन 'पति पत्नी और वो' चित्रपटामध्ये झळकणार आहे, तर दुसरीकडे सनी सिंगच्या आगामी 'उजडा चमन' चित्रपटाच्या चर्चा देखील चांगल्याच रंगल्या आहेत. मुदस्सर अजीज दिग्दर्शित 'पती पत्नी और वो' चित्रपटात एक अशी परिस्थती उद्भवते ज्यात सनी पाहुण्या कलाकाराच्या रूपात झळकणार आहे. 

Read More