मुंबई : विवाहबाह्य संबंधांवर आधारीत अभिनेता कार्तिक आर्यनचा 'पती पत्नी और वो' चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 1978 साली प्रदर्शित झालेला चित्रपट हा बॉलिवूडमधल्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट होता. रविवारी कार्तिकने सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख 6 डिसेंबर असल्याचं सांगितलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज यांनी केले आहे.
Aa rahe hai saal ke end mein !! #PatiPatniAurWoh will release on
— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) March 24, 2019
6th Dec 2019 @bhumipednekar #AnanyaPanday
@mudassar_as_iz @itsBhushanKumar, @junochopra, #RenuChopra, #KrishanKumar pic.twitter.com/FoLKeQgGhL
चित्रपटात कार्तिकसह अभिनेत्री भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत. 1978 साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ चित्रपटाने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या चित्रपटामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. याच पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी हा चित्रपट पुन्हा साकारण्याची जबाबदारी घेतली.
चित्रपटात अभिनेता संजीव कुमार मुख्य भूमिकेत झळकले होते. तर विद्या सिन्हा त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसल्या होत्या. रंजीता कौरने संजीवच्या सेक्रेटरीच्या भूमिकेला न्याय दिले होते.
'पती पत्नी और वो' चित्रपटाच्या निमित्ताने कार्तिक, भूमि, अनन्या हे त्रिकूट चाहत्यांना एकत्र दिसणार आहे. चित्रपटासाठी सर्वात आधी अभिनेत्री तापसी पन्नूच्या नावाची चर्चा रंगली होती. त्यानंतर तिच्या जागी अभिनेत्री भूमि पेडणेकरची वर्णी लागली.