Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' अभिनेत्याला व्हायचंय कॅटरिनाच्या मुलांचा बाप

 एका बॉलिवूड स्टारने कॅटरीनाच्या मुलाचा बाप व्हायला आवडेल असं म्हटलंय. 

'या' अभिनेत्याला व्हायचंय कॅटरिनाच्या मुलांचा बाप

मुंबई: सलमान खानच्या खास मैत्रिणींसोबत कोणी जवळीक साधलेली त्याला आवडत नाही. ऐश्वर्या रायशी मैत्री केलेल्या विवेक ऑबेरॉयला सलमानने धमकावल्याचे किस्से आजही रंगवून सांगितले जातात. सलमान आणि त्याच्या गर्लफ्रेंड हा स्वतंत्र चर्चेचा मुद्दा झालायं.  कॅटरीना कैफ आणि सलमानच्या घनिष्ट मैत्रीसंबंधी एव्हाना साऱ्या दुनियेला समजलंय. अशातच एका बॉलिवूड स्टारने कॅटरीनाच्या मुलाचा बाप व्हायला आवडेल असं म्हटलंय. आता हे जर सलमानला समजल तर त्या अभिनेत्याचं काय होईल अशी चर्चा  होतेयं.

'कॅटरिनाच्या मुलांचा बाप'

'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारखे हिट सिनेमा देणारा कार्तिक अय्यन पुन्हा चर्चेत आलाय. तसं पाहिलं तर त्याच्याकडे बरेच सिनेमा आहेत पण तो सध्या त्याच्या स्टेटमेंटमुळे जास्त चर्चेत आहे. फॅशन डिझायनर अनाइता अदजानियाच्या 'फीट अप विद द स्टार्स' या चॅट शोमध्ये तो आला होता. यावेळी त्याने अनेक मजेशीर प्रश्नांची उत्तरे दिली. अनाइताने शोचा प्रोमो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलायं.

म्हणून आवडते करिना  

कोणत्या एक्ट्रेसच्या मुलांचा बाप व्हायला आवडेल ? असा प्रश्न  कार्तिकला विचारण्यात आला. यावर अजिबात वेळ न घालवता कॅटरिना कैफचं नाव त्याने घेतलं. यामागचं कारणही त्याने सांगितलं. मला अशा एक्सेंट बोलणाऱ्या अभिनेत्री आवडतात असे तो म्हणाला.

करणला करायचंय लग्न

कॅटरीना सध्या सलमानसोबत 'भारत' सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. कार्तिकचं हे स्टेटमेंट ऐकून सलमानला राग येऊ शकतो. या चॅट शोमध्ये काही दिवसांपूर्वी करण जोहरही आला होता. मी अंडरसेक्स्ड आणि अंडरपेड असल्याचं त्याने सांगितलं. बॉलिवूडमध्ये कोणासोबत लग्न करण्याची संधी मिळाली तर करिनासोबत लग्न करेनं असं त्याने यावेळी सांगितलं.

Read More