Marathi News> मनोरंजन
Advertisement

कार्तिक थिरकला सैफ अली खालच्या गाण्यावर

दिल्लीत चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण टीमने एका पार्टीचे आयोजन केले होते.

कार्तिक थिरकला सैफ अली खालच्या गाण्यावर

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान सध्या चांगलेच चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून त्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो मोठया प्रमाणावर व्हायरल होत आहेत. नुकताच त्यांच्या आगामी चित्रपटाचे दिल्लीचे शुटिंग पूर्ण करण्यात आले आहे. 'लव आज कल 2' चित्रपटामध्ये सारा आणि आर्यन पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. 

 

 

दिल्लीत चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण टीमने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये कार्तिक अभिनेता सैफ अली खानच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हे व्हिडिओ कार्तिकने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने साराला खूप मिस करत असल्याचे म्हंटले आहे.   

चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा सुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'लव आज कल २' चित्रपट 'लव आज कल' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. 'लव आज कल' चित्रपट १० वर्षआधी प्रदर्शित झाला असून चित्रपटात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. 

Read More