कार्तिकी गायकवाड जिने 'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्सचं विजेतेपद जिंकलं तिचा नुकताच 'अंगाई' चा व्हिडीओ समोर आला आहे. कार्तिकी गेल्यावर्षीच आई झाली आहे. तिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. या अंगाईच्या माध्यमातूनच कार्तिकीने मुलाचं नाव आणि पहिली झलक दाखवली आहे.
कार्तिकी कल्याणजी गायकवाड या आपल्या युट्यूब चॅनलवर 'नीज बाळा' या अंगाईचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या बाळाची पहिली झलक आणि त्याचं नाव जगासमोर आणलं आहे.
कार्तिकीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मुलाचं नाव सांगितलं आहे. "रिशांक कार्तिकी रोनित पिसे'' हे नाव स्क्रिनवर दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे रिशांक 11 महिन्यांचा झाला असून तो नुकताच चालू लागला आहे. व्हिडीओमध्ये रिशांक, कार्तिकी आणि रोनितचे छान क्षण पाहायला मिळत आहे.
शास्त्रांमध्ये रिशांक हे नाव खूप चांगले मानले जाते आणि त्याचा अर्थ म्हणजे भगवान शिवाचा भक्त देखील लोकांना आवडतो. जसे आपण सांगितले की, रिशांक म्हणजे भगवान शिवाचा भक्त आणि रिशांक नावाच्या व्यक्तीच्या वागण्यातही तुम्हाला या अर्थाचा परिणाम दिसून येतो.
अंगाई 'नीज बाळा' स्वतः कार्तिकी गायकवाड हिने गायली आहे. या अंगाईची निर्मिती तिचे वडील कल्याणजी गायकवाड यांनी केली आहे. या गाण्यात कार्तिकी सोबत तिचा पती रोनित पिसे व बाळ दिसतंय. कार्तिकीने पहिल्यांदा बाळाचा चेहरा जगासमोर आणला आहे. . विशेष म्हणजे गाण्याच्या सुरुवातीलाच तिने बाळाचे नाव देखील जाहीर केले आहे. गाण्याच्या सुरुवातीला कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, इंट्रोड्युसिंग रिशांक कार्तिकी रोनित पिसे...