Marathi News> मनोरंजन
Advertisement

कश्मीरा शाहचा लॉस एंजिल्समध्ये झाला गंभीर अपघात; रक्तानं माखलेल्या कपड्यांचा फोटो शेअर करत म्हणाली...

Kashmera Shah Accident In LA : कश्मीरा शाहनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली तिच्या अपघाताची बातमी...

कश्मीरा शाहचा लॉस एंजिल्समध्ये झाला गंभीर अपघात; रक्तानं माखलेल्या कपड्यांचा फोटो शेअर करत म्हणाली...

Kashmera Shah Accident In LA : अभिनेत्री कश्मीरा शाहचा एक गंभीर अपघात झाला आहे. त्याचे फोटो कश्मीरानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. रक्तानं माखलेल्या कपड्यांचा फोटो कश्मीरानं शेअर केला असून तिची कोणी विचारपूस करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर कृष्णा अभिषेकनं कमेंटमध्ये चिंता व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर इंडस्ट्रीमधील लोकांनी देखील चिंता व्यक्त केली असून नेमकं प्रकरण काय झालं होतं याचा खुलासा कश्मीरानं केला आहे. पण अशात कश्मीरानं एक भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. 

कश्मीरा शाह ही सध्या लॉस एन्जिल्समध्ये आहे. तर तिचे दोन्ही मुलं रेयान आणि कृषांग हे कृष्णा अभिषेकसोबत मुंबईला परतले. त्यानंतर त्या दोघांनी अनेक रील्स शेअर केले. एकीकडे कृष्णा अभिषेक त्याच्या मुलांसोबत आनंदी आहे आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतोय. तर कश्मीरा त्यांना मीस करते. आता कश्मीरानं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कश्मीरा शाहनं रक्तानं माखलेल्या कपड्याचा फोटो तिनं शेअर केला आहे. हे शेअर करत कश्मीरानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की 'देवा, मला वाचवण्यासाठी तुझे आभार. खूप भयानक घटना घडली. काही मोठं होणार होतं, पण नशिबानं थोडक्यात झालं. आशा आहे की दुखापतीचे निशाण राहणार नाही. आज मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येतेय. कृष्णा अभिषेकसोबत दोन्ही मुलांची नावं देखील लिहिली आहेत.'  

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या माजी सिक्योरिटी गार्डनं दिला 'बिग बॉस 18' ला नकार; म्हणाला, 'रॉ एजेंट आहे आणि...'

कश्मीराच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी तिच्यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे तर त्याशिवाय या पोस्टवर सेलिब्रिटींनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. राजेश खट्टरनं विचारलं की 'कैश काय झालं तुला? आशा आहे की सगळं काही चांगलं होईल.' कृष्णा अभिषेकनं कमेंट केली की 'देवाच्या कृपेनं तू आता ठीक आहेस.' किश्वर मर्चेंट म्हणाली देवा, 'तू ठीक आहेस ना?' दीपिशिखा नागपालनं लिहिलं की 'हे काय झालं??? तू लवकर परत ये.' पूजा भट्टनं देवा, 'कैश नेमकं काय झालं. आशा करते की ती लवकर ठीक होशील', अशी कमेंट केली आहे. 

Read More