Marathi News> मनोरंजन
Advertisement

Valentine's Day च्या दिवशी विकीने कतरिनासाठी जे केलं, व्हिडिओ व्हायरल

त्यांची केमिस्ट्री सगळ्यांनाच आवडत आहे.

  Valentine's Day च्या दिवशी विकीने कतरिनासाठी जे केलं, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : सध्या सगळीकडेच व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे अनेक कपल्स हा दिवस एकत्र साजरा करतात. आणि एकमेकांना गिफ्ट देखील देतात.

बॉलिवूडमध्ये ही असे अनेक लव्ह बर्ड आहेत ज्यांची जोडी चाहत्यांना फार आवडते. त्यातीलच एक म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची जोडी आहे.

हे कपल लग्नानंतर  व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याआधी या कपलचा एक गोड व्हिडिओ समोर आला आहे. दोघांचा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहेत. 

नवविवाहित जोडपे विकी कौशल आणि कतरिना कैफ त्यांचा पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहेत. अलीकडेच हे दोन्ही लव्ह बर्ड्स डेनिम लूकमध्ये हातात हात घालून विमानतळावर दिसले.

एअरपोर्टवर स्पॉट झालेले हे जोडपे एकाच आऊटफिटमध्ये दिसले. विकीने डेनिम जीन्ससह पांढरा टी-शर्ट आणि डेनिम जॅकेट घातले होते. त्याचबरोबर कतरिनाही डेनिम शर्ट आणि जीन्समध्ये दिसली. दोघांचा हा ट्विनिंग डेनिम लूक खूपच मस्त दिसत होता. 

व्यस्त शेड्युल असूनही दोघेही एकत्र कोणताही सण साजरा करायला विसरत नाहीत. लोहरीच्या वेळी कतरिना विकीला भेटण्यासाठी इंदौरला पोहोचली होती. जिथे विकी त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. आणि आता पहिल्या व्हॅलेंटाईनला दोघे एकत्र दिसले आहेत. खास व्हॅलेंटाईनसाठी विकीने कामातून ब्रेक घेतल्याचं बोललं जात आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विकीला त्याच्या लेडी लव्हसोबतचा पहिला व्हॅलेंटाईन चुकवायचा नव्हता. कतरिनानेही या खास दिवसासाठी तिच्या कामातून ब्रेक घेतला आणि पतीसाठी वेळ काढला. आज दोघेही एकत्र क्वालिटी टाईम घालवणार आहेत. त्याचा एअरपोर्टवर लूक आणि त्यांची केमिस्ट्री सगळ्यांनाच आवडत आहे.

Read More