Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानच्या स्टायलिस्टला कतरिनाच्या लग्नाची घाई, विकी आणि कतरिना अडकणार लग्नबंधनात?

सलमान खानचा कॉस्टूम डिझाईनर आणि स्टायलिस्ट अ‍ॅशले रिबेलोनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळतेय.

सलमानच्या स्टायलिस्टला कतरिनाच्या लग्नाची घाई, विकी आणि कतरिना अडकणार लग्नबंधनात?

मुंबई: सुपरस्टार कतरिना कैफचा वाढदिवस 16 जुलै रोजी साजरा झाला. कतरिनाला वाढदिवसानिमित्त जगभरातील तिच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या. सोबतच तिच्या दीर्घायुष्यासाठी  आणि यशासाठी सगळ्यांनी प्रार्थना केली. तिच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक सलमान खानचा कॉस्टूम डिझाईनर आणि स्टायलिस्ट अ‍ॅशले रिबेलोनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळतेय.

 अ‍ॅशले रिबेलोच्या या इन्स्टाग्राम स्टोरीवर कतरिना कैफ वेडिंग गाऊनमध्ये दिसत आहे. हा फोटो सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाच्या वेळचा आहे. हा फोटो शेअर करताना अ‍ॅशलेनं लिहिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा कतरिना. "हा फोटो लवकरच खरा होऊ दे."

fallbacks

कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सलमानच्या स्टायलिस्टने देखील कतरिनाला वेडिंग लूकमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कतरिना कैफचं नाव सध्या विकी कौशलसोबत जोडलं जात आहे. दोघांच्या अफेअरची चर्चा बी-टाऊनमध्ये आहे. पण अद्याप या जोडीने आपल्या रिलेशनशीपबद्दल कोणतीच माहिती दिलेली नाही, 

अनेक फक्शनला ही जोडी एकत्र दिसून आली आहे.दरम्यान अभिनेता हर्षवर्धन कपूरनं या दोघांच्या नात्यावर भाष्य करत हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Read More