Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नानंतर कतरिनाने विकीसाठी बनवली स्पेशल डिश

कतरिनाचा हटके अंदाज 

लग्नानंतर कतरिनाने विकीसाठी बनवली स्पेशल डिश

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच लग्न होऊन दोघांनी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरूवात केली आहे. लग्नानंतर कतरिना कैफने आपल्या सोशल मीडियावरील आपला प्रोफाईल फोटो बदलला आहे. कतरिना आणि विकीच्या लग्नातील खास फोटो शेअर केला आहे. 

यासोबतच कतरिनाने विकी कौशलच्या घरी पहिला पदार्थ बनवला आहे. याचा फोटो देखील तिने शेअर केलाय. कतरिनाने कौशल यांच्या घरी पहिला पदार्थ शिरा बनवला आहे. 

fallbacks

कतरिनाने आपल्या इंस्टाग्राम स्टेटसवर 'Maine Banaya'असं म्हणत शिऱ्याचा फोटो शेअर केलाय. तसंच तिने 'Chaunka Chardhana...' असं म्हणत स्माईली पोस्ट केली आहे. 

fallbacks

कतरिना विकीपेक्षा अव्वल 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरिना विकीपेक्षा अनेक गोष्टीत अव्वल आहे. अगदी इंस्टाग्राम फॉलोअर्सबद्दल बोलायचं झालं तर कतरिनाने विकीला मागे टाकलं आहे. विकीला इंस्टाग्रामवर 11.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर कतरिनाला 59 मिलियन फॉलोअर्स आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

याचे कारण असेही असू शकते की, विकी कौशलला कतरिना कैफपेक्षा बॉलिवूडमध्ये कमी वेळ मिळाला आहे. 2015 मध्ये, विकीचा पहिला मुख्य भूमिका असलेला 'मसान' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या अर्थाने विकीला इंडस्ट्रीत फक्त ५ वर्षे झाली आहेत. त्याचवेळी कतरिना कैफला इंडस्ट्रीत 2 दशके पूर्ण होत आहेत. कतरिनाने 2003 मध्ये बूम या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

Read More