Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना कैफच्या आईने उचललं मोठ पाऊल

कतरिना कैफच्या आईने तिच्या स्ट्रगलच्या दिवसांमध्ये तिला नेहमीच संभाळलं आहे. 

 रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना कैफच्या आईने उचललं मोठ पाऊल

मुंबई : कतरिना कैफच्या आईने तिच्या स्ट्रगलच्या दिवसांमध्ये तिला नेहमीच संभाळलं आहे. एक काळ असा होता जेव्हा कतरिना कैफने रणबीर कपूरसोबत 6 वर्षे कमिटेड रिलेशनशिपमध्ये राहून ब्रेकअप केलं होतं. कतरिना कैफ रणबीरसोबत लग्न करणार होती. पण लग्नाची गोष्ट आल्यावर दोघांमध्ये अंतर निर्माण झालं आणि ब्रेकअप झालं. मात्र, आईच्या सल्ल्याने कतरिनाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप मदत मिळाली.

कतरिना कैफने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, रणबीरपासून विभक्त झाल्यानंतर ती खूप वाईट परिस्थितीतून जात असताना तिच्या आईने तिला साथ दिली. तिने उघड केलं की, तिच्या आईने तिला सांगितलं की, ब्रेकअपचा सामना करणारी ती एकटीच नाही आणि ती नक्कीच या वेदनांवर मात करेल. कतरिनाने सांगितलं की, 'पुन्हा पुढे जाण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. मात्र, आईच्या मदतीने हे सगळं सहज करु शकली.

fallbacks

कतरिना पुढे म्हणाली की, त्या वाईट काळात जिने मला सगळ्यात जास्त मदत केली ती माझी आई आहे. तिने मला सांगितलं की, अनेक मुली आणि महिला अशाच परिस्थितीतून जातात. तुम्हाला वाटतं की तुम्ही एकटे आहात पण तुम्ही एकटे नसतात.

Read More