Marathi News> मनोरंजन
Advertisement

कतरिना कैफ सलमान खानसमोर उलगडणार लग्नाचं मोठं गुपित?

एक वर्षाहून अधिक काळ पुढे ढकलल्यानंतर निर्माते आता हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. 

कतरिना कैफ सलमान खानसमोर उलगडणार लग्नाचं मोठं गुपित?

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि अजय देवगण यांचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट 5 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. एक वर्षाहून अधिक काळ पुढे ढकलल्यानंतर निर्माते आता हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. स्टार कास्टने मोठ्या प्रमाणात प्रमोशन सुरू केले आहे.

वैवाहिक जीवनाशी संबंधित रहस्ये उघड 

याच क्रमात बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने सर्वात मोठा रिअ‍ॅलिटी टीव्ही शो 'बिग बॉस'मध्ये पाऊल ठेवले. कतरिना कैफ तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोचा भाग बनली आहे. कतरिना कैफने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या शोमध्ये येण्याचे संकेत दिले आहेत. अभिनेत्रीने साडीतील स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे.

या शोमध्ये कतरिनाची एन्ट्री

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. आता 'बिग बॉस'मध्ये ती या प्रश्नाचे उत्तर देणार का हे पाहावे लागेल. ती तिच्या लग्नाशी संबंधित मुद्द्यांवर बोलेल का? कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी नुकतेच रिअॅलिटी टीव्ही शो 'द बिग पिक्चर'मध्ये पोहोचले होते. दोघांनी सेटवर खूप धमाल केली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सर्व पात्र एकत्र येतील

याशिवाय कतरिना कैफ रियालिटी टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती'मध्येही दिसली आहे. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' हा रोहितचा पोलीस विश्वातील चौथा चित्रपट असेल. यापूर्वी त्याने सिंघम, सिंघम-2 आणि सिम्बा हे चित्रपट बनवले आहेत. या चित्रपटात तो सर्व पात्रांना एकत्र आणणार आहे.

Read More