Marathi News> मनोरंजन
Advertisement

Katrina Kaif - Vicky Kaushal Wedding : दोन्ही कुटुंबात लग्नाची धामधूम, वेडिंग आऊटफिट्स करता 'या' डिझाइनरची निवड

या महिन्यात कतरिना - विकी लग्नबंधनात अडकणार?

Katrina Kaif - Vicky Kaushal Wedding : दोन्ही कुटुंबात लग्नाची धामधूम, वेडिंग आऊटफिट्स करता 'या' डिझाइनरची निवड

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीमधील गॉर्जियस डॉल कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या अफेअरपाठोपाठ आता त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप या दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिलेली नाही. रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकी यांच्या घरी लग्नाची धामधूम सुरू झाली आहे. 

दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडचे लव बर्ड्स खूप चर्चेत आहेत. कतरिना कैफ आणि विक्की कौशल एकमेकांचा हात आयुष्यभरासाठी पकडणार आहेत. लवकरच हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकीनेही त्यांच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. सूत्रांनी सांगितले की, "कतरिना आणि विकीच्या लग्नाचे कपडे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची तयार करणार आहे. आता सध्या हे दोघं आपल्या लग्नाच्या कपड्याचे फॅब्रिक पाहत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, कतरिनाने रॉ सिल्क फॅब्रिक निवडलं आहे. कतरिना आणि विकी कौशल नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. यामध्ये अभिनेत्री लहंगा नेसणार आहे. तुम्हाला सांगतो की, लग्नाची बातमी समोर येण्यापूर्वीच कतरिना आणि विकीच्या रोका सेरेमनीच्या बातम्यांनीही बरीच चर्चा रंगली होती. असे वृत्त होते की दोघांनी अतिशय खासगी आणि गुप्तपणे हा सोहळा साजरा केला. 

15 वर्षांपासून कतरिनाच्या लग्नाची चर्चा 

प्रतीक्षा होती ती फक्त विकी किंवा कतरिनाच्या अधिकृत प्रतिक्रियेची. अखेर कतरिनानं या साऱ्यावर मौन सोडत मोठा खुलासा केला. मागच्या जवळपास 15 वर्षांपासून मला हा प्रश्न विचारला जात आहे, असं म्हणत आपल्यासमोर कायमच हा लग्नाचा प्रश्न मांडला गेल्याचं तिनं स्पष्ट केलं. आता कतरिनानं दिलेलं हे उत्तर पाहता, नेमकं सत्य काय हाच नवा प्रश्न अनेकांपुढे उभा राहिला आहे. काहींनी तर या प्रकरणी डिसेंबरचीच वाट पाहण्याचा पर्याय निवडला आहे. 

Read More