Marathi News> मनोरंजन
Advertisement

शेवटी 'वर'शोध संपलाच; कतरिनाचं लग्न होताच नानांच्या लेकाची लय भारी पोस्ट

नेटकरी विचारतात कतरिनाचं उरकलं, आता मल्हारचं केव्हा ?   

शेवटी 'वर'शोध संपलाच; कतरिनाचं लग्न होताच नानांच्या लेकाची लय भारी पोस्ट

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नानंतर सर्वांनाच प्रचंड आनंद झाला. सेलिब्रिटी वर्तुळातूनही या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. अतिशय गोपनीय अशा या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर खुद्द विकी आणि कतरिनानं अधिकृतपणे पोस्ट केले आणि एकच कल्ला झाला. 

कतरिनानं विकीपेक्षाही फार आधी चित्रपट वर्तुळात सुरुवात केली होती. काही मोठ्या कालकारांसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी तिला मिळाली. 

कतरिनानं स्क्रीन शेअर केलेल्या मोठ्या नावांपैकी एक म्हणजे अभिनेते नाना पाटेकर. 'वेलकम' या चित्रपटातून तिनं त्यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. 

इथं आपल्या बहिणीसाठी योग्य नवरामुलगा शोधण्यासाठी डॉन उदय शेट्टी नेमका काय खटाटोप करतो हेसुद्धा चित्रपटातून दाखवलं गेलं होतं.

आता जेव्हा खऱ्या आय़ुष्यात कतरिनाचं विकी कौशलशी लग्न झालं आहे, तेव्हा नानांचा मुलगा मल्हार यानं अतिशय विनोदी पोस्ट शेअर केली आहे. 

कतरिना आणि विकीच्या लग्नानंतर सोशल मीडियावर असंख्य मीम्स व्हायरल झाले. पण, मल्हार पाटेकरच्या फेसबुक अकाऊंटवरन पोस्ट करण्यात आलेला फोटो आणि व्हिडीओ विशेष गाजला. 

'वेलकम' याच चित्रपटातून एका सीनचा स्क्रीनशॉट पोस्ट करत, 'शेवटी उदय भाईला त्याच्या बहिणीसाठी योग्य वर मिळालाच... शुभेच्छा विकी...', असं कॅप्शन त्यानं दिलं आहे.

fallbacks

मल्हारची ही पोस्ट कमालीची व्हायरल झाली आहे. अनेकांनीच ती शेअर करत त्याच्या विनोदबुद्धीला दाद दिली आहे. 

Read More