Marathi News> मनोरंजन
Advertisement

पाहा, कतरिनाच्या आईसाठी विकीनं जे केलंय, ते कौतुकास्पद...

पाहा का लक्ष वेधतंय हे अनोखं नातं....

पाहा, कतरिनाच्या आईसाठी विकीनं जे केलंय, ते कौतुकास्पद...

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल ही नवविवाहित सेलब्रिटी जोडी सध्या त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो सर्वांच्याच भेटीला आणत उत्सुकता आणखी वाढवत आहेत. लग्न कसं झालं इथपासून विकी- कॅटच्या लग्नाचा मेन्यू काय होता इथपर्यंतचे पदर आता उलगडू लागले आहेत. त्यातच खुद्द कतरिना आणि विकीही त्यांच्या या नव्या नात्याचे बहुविध पैलू सर्वांसमोर आणत आहेत.

कॅट आणि विकीच्या लग्नानंतर अनेकांनीच त्यांना शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट केल्या. यामध्ये कतरिनाच्या बहिणीनं शुभेच्छा देत विकीच्या रुपात आपल्याला एक भाऊच भेटल्याची भावना व्यक्त केली.

कतरिनाच्या कुटुंबात विकीची जावई म्हणून झालेली एंट्री सर्वांच्याच मनाचा ठाव घेऊन गेली. आता याच जावयानं कतरिनासोबत मिळून तिच्या आईसाठी एक कमाल गोष्ट केली आहे.

विकीनं जे केलंय त्यासाठी त्याचं कौतुकही केलं जात आहे.

कतरीना आणि विकीनं नुकत्याच केलेल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून याचा अंदाज लावता येत आहे.

fallbacks

‘To love, Honour and cherish’ असं कॅप्शन देत त्यांनी हे नवे फोटो शेअर केले आहेत. जिथं कतरिना नेटेड फ्लोरल प्रिंटची साडी नेसलेली दिसत आहे. तिच्या हातात एक परदेशी फुलांचा गुलदस्ता आहे. तर, विकी हलक्या गुलाबी रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे.

fallbacks

लग्नापूर्वीच्या काही समारंभांमध्ये कतरिनानं आणि विकीनं तिच्या आईकडील ब्रिटीश पाळंमुळं पाहता त्यांच्या सन्मानार्थ हा लूक केला होता.

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यानं तिचा हा लूक डिझाईन केला होता.  

fallbacks

कतरिनाच्या आईप्रती व्यक्त केलेली भावना आणि विकीनं निभावलेली भूमिका सध्या सर्वांची मनं जिंकून जात आहे. त्यामुळं त्याचं होणारं कौतुक स्वाभाविकच आहे.

Read More