Marathi News> मनोरंजन
Advertisement

'हा' आहे कतरिना कैफचा फिटनेस फंडा

बॉलिवूडची चिकनी चमेली कतरिना कैफचे सौंदर्य आणि हॉट फिगर घायाळ करणारी आहे.

'हा' आहे कतरिना कैफचा फिटनेस फंडा

मुंबई : बॉलिवूडची चिकनी चमेली कतरिना कैफचे सौंदर्य आणि हॉट फिगर घायाळ करणारी आहे. वयाच्या ३५ व्या वर्षीही तिचा फिटनेस दमदार आहे. तिच्या या फिटनेसचे रहस्य काय आहे, ठाऊक आहे? या तर मग जाणून घेऊया...

नियमित करते हे एक्सरसाईज

आपल्या ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांना वेड लावणारी कतरिना कैफच्या फिटनेसची जबाबदारी तिचा फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवालाने घेतली आहे. तिच्या या परफेक्ट फिगरमागे तिची तगडी मेहनत आहे. कतरिना कैफ फिटनेससाठी पिलेट्स, कार्डियो आणि फंक्शनल ट्रेनिंग करते. फक्त फिट राहण्यासाठी नाही तर मन शांत ठेवण्यासाठी या व्यायामाचा फायदा होतो, असे कतरिनाचे म्हणणे आहे.

डाएट प्लॅन

व्यायामासोबतच फिटनेससाठी ती खाण्या-पिण्यावरही विशेष लक्ष ठेवते. शरीराच्या गरजेनुसार खायला हवे, असे कतरिनाचे म्हणणे आहे. ब्रेकफास्टसाठी ती ओट्स आणि फ्रेश ज्यूस घेते. तर दुपारच्या जेवणात सलाड, फळे आणि फळभाज्यांचा समावेश करते. त्याचबरोबर कतरिना तळलेल्या आणि गोड पदार्थांपासून लांब राहणेच पसंत करते. कतरिना स्नॅक्समध्ये ताजी फळे, सुकामेवा घेते. तर जेवणात अधिकतर प्रोटीन्स आणि फायबर्सचा समावेश करते. तर रात्री डाळ आणि भाज्या खाणे पसंत करते.

 

Read More