Marathi News> मनोरंजन
Advertisement

विनोदाच्या नावावर विभत्स वक्तव्य; 'रं... एक प्रोफेशन है’ म्हणणाऱ्या कॉमेडियनवर सेलिब्रिटींची आगपाखड

Kaviraj Singh Comedian Controversy Misogynistic Joke : स्टँडअप कॉमेडी हा ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये चांगलाच लोकप्रियता मिळवताना दिसला, मात्र अनेकदा याच प्रकारात कैक मर्यादांचं उल्लंघन झालं...   

विनोदाच्या नावावर विभत्स वक्तव्य; 'रं... एक प्रोफेशन है’ म्हणणाऱ्या कॉमेडियनवर सेलिब्रिटींची आगपाखड

Kaviraj Singh Comedian Controversy Misogynistic Joke : स्टँडअप कॉमेडी... काळानुरुप बदलत आलेला विनोदाचाच एक प्रकार. मात्र विनोदाच्या याच सादरीकरणादरम्यान पातळी सोडून दर्जाहीन वक्तव्य करण्याचे प्रकार आजवर बऱ्याचदा घडले आणि वेळोवेळी त्याचा कडाडून विरोधही झाला. आता पुन्हा एकदा हाच मुद्दा कलाजगतामध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, कॉमेडियन कविराज सिंह नेटकऱ्यांसह सेलिब्रिटींच्याही निशाण्यावर आला आहे. 

महिला इन्फ्लुएन्सरची तुलना देहविक्री करणाऱ्या महिलांशी करणारं एक वक्तव्य करत कविरात त्यातून एक विचित्र विनोदनिर्मिती (Dark Humor) करताना एका व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. तो नेमकं काय म्हणू इच्छितोय, असा संतप्त सवाल हा व्हिडीओ पाहून नेटकरी उपस्थित तरत आहेत. तर, संधी मिळेल तसे त्याला खडे बोलही सुधारत आहेत. 

कविराज सिंह असं काय म्हणाला ज्यामुळं सेलिब्रिटीसुद्धा संतापले? 

'रं... एक प्रोफेशन है… कई लोग उन्हें ये नहीं कहते, इन्फ्लुएंसर कहते हैं', अर्थात इथं गरज नसताना दोन विषय एकत्र आणून त्यांच्यामध्ये तुलना करत विनोद करण्याचा प्रयत्न कविराजनं केला, त्याच्यासमोर बसलेल्या कथित 'सुजाण' प्रेक्षकांना हा विनोद ऐकून हसूसुद्धा आलं. मात्र सोशल मीडियावर जेव्हा त्याच्या या स्टँडअप शोमधील व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा मात्र महिलांबाबतचं त्याचं हे वक्तव्य न पटलेल्यांचीच संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळालं. 

'डार्क ह्यूमर'च्या नावाखाली समाजातील काही विशिष्ट घटकांविरोधातील द्वेष भडकवण्याचा प्रयत्न कविराज करत असल्याचा आरोप त्याच्यावर केला जात आहे. अनेक डिजिटल क्रिएटर तरुणी आणि महिला Influencers नीसुद्धा यावरून त्याला खडे बोल सुनावले आहेत. कुशा कपिला, ही त्यापैकीच एक. 

हे जाणीवपूर्वक केलं जातंय?

इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून कुशा कपिलानं कविराजचा खरपूस समाचार घेतला. 'हा काय घाणेरडा प्रकार आहे? मला धक्का बसलाय? छे! सोशल मीडियावर तर महिलांना 'र' नं उद्देशून बोलणं आता अतिसामान्य झालं आहे, हा तर आचा विनोदाचा विषय आहे. अशी वक्तव्य चुकून नव्हे, तर चर्चेत राहण्यासाठी जाणीवपूर्वक केली जातात' असा उपरोधिक आणि सणसणीत टोला लगावत आपल्या वक्तव्याचा नेमका काय परिणाम होणार आहे याची त्या कॉमेडियनला पूर्ण कल्पना असल्याचा गंभीर आरोप कुशा कपिलानं केला. 

वाईट बाब ही, की त्या विनोदवीराला पाठिंबा देणारी मंडळी असून, ही विचारसणीच मुळात प्रचंड धोकादायक आहे आणि ती आपल्याला सातत्यानं मागे लोटतेय, असं म्हणत कुशानं सोशल मीडियावर महिलांना केंद्रस्थानी ठेवत त्यांच्यावर टीका करण्याच्या या पद्धतीचा आणि मानसिकतेचा कडाडून निषेध केला. गेल्या 7 वर्षांपासून आपण कंटेंट क्रिएशन आणि सोशल मीडियाच्या या वर्तुळात आहोत आणि तेव्हापासून हे असंच कायम होत आलं आहे ही दु:खद वस्तुस्थिती तिनं सर्वांसमक्ष आणली. 

हेसुद्धा वाचा : हा काय प्रकार? दारुची रिकामी बाटली द्या, पैसे न्या! राज्य शासनाची अजब योजना

fallbacks

महिलांनी कितीही विरोध केला तरीही...

महिलांनी कितीही विरोध केला तरीही ही मानसिकता कधीही न संपणारी आहे ही अतिशय दुर्दैवी बाब अधोरेखित करत कुशानं फक्त एका कॉमेडियनवर नव्हे तर या मानसिकतेच्या साऱ्यांवरच आगपाखड केली. डिजीटल माध्यमांचा प्रत्यक्ष जीवनावरही थेट परिणाम होतो असं सांगत तिनं परिस्थितीचं, शब्दांचं गांभीर्य आणि सध्याच्या वातावरणात भान ठेवून वागणं किती महत्त्वाचं आहे हेच आपल्या संतप्त प्रतिक्रियेतून स्पष्ट केलं. कविराजच्या या विभत्स वक्तव्यावर सध्या नेटकरीसुद्धा व्यक्त होत असून आता त्यावर त्याची काही प्रतिक्रिया येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Read More