Anirudh Ravichander : आपल्या भारतात असे अनेक संगीतकार आहेत ज्यांनी त्यांच्या संगीतानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. प्रत्येक संगीतकाराची एक वेगळी स्टाईल आहे, त्यासाठी ते ओळखले जातात. अशात भारतातीत सगळ्यात जास्त लोकप्रिय आणि श्रीमंत कोणता संगीतकार आहे असा प्रश्न जर कोणी विचारला तर तुमच्या तोंडात लगेच ए.आर. रहमानचं नाव येईल. त्यानंतर जर कोणता असेल तर तो दिलजीस दोसांझ आहे असं तुम्ही म्हणाल, कारण ते दोघेही ग्लोबल स्टार आहेत. पण तुम्हाला माहितीये का की देशातील सगळ्यात श्रीमंत संगीतकार हे दोघेही नाही आहेत. तर असा एक संगीतकार आहे ज्याची गाणी आपण अनेकदा ऐकतो पण आपल्या तो लक्षातही राहत नाही. त्याचं नाव वाचतो आणि हा कोण असेल जो इतकी सुंदर गाणी बनवतो असा प्रश्न तुम्हाला पडेल. चला तर त्याच्याविषयीच जाणून घेऊया की कोण आहे तो संगीतकार...
हा संगीतकार दुसरा कोणी नसून 33 वर्षांचा अनिरुद्ध रविचंद्र आहे. अनिरुद्धनं कमाईच्या बाबातीत चक्क ए.आर.रहमानला मागे टाकलं आहे. मगाशी म्हटल्या प्रमाणे अनिरुद्धच्या गाण्यांवर अनेकदा सगळेच थिरकले आहेत. त्याची गाणी ऐकूण अनेकांना वाटतं हा कोणी दुसरा असेल पण त्याला प्रत्यक्षात किंवा त्याच्या सोशल मीडिया पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसतो की हा तोच आहे. कारण वयाच्या 33 व्या वर्षी अनिरुद्ध हा चक्क 9 आकडी मानधन घेतो.
अनिरुद्धनं आजवर किंग खान अर्थात शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटासाठी गाणी तयार केलीत. याच चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यापूर्वी अनिरुद्धनं रजनीकांत यांच्या 'जेलर', 'पेट्टा', विजय थालापतीचा 'मास्टर', धानुषचा 'मारी' आणि 'विक्रम'सारख्या चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. तर 'न्यूज 18' नं दिलेल्या माहितीनुसार अनिरुद्धनं 'जवान'साठी 10 कोटी रुपये मानधन घेतलं.
अनिरुद्धच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर तो रजनीकांत यांचा भाचा आहे. फक्त रजनीकांत नाही तर त्यांचं संपूर्ण कुटुंब हे कला क्षेत्रातून आहे. अनिरुद्ध हा अभिनेता रवि राघवेंद्र आणि शास्त्रीय नृत्यांगना लक्ष्मी यांचा मुलगा आहे. त्याची मावशी लता यांचं लग्न रजनीकांत यांच्यासोबत झालं आहे. त्याचे पणजोबा के. सुब्रमण्यम हे 1930 च्या दशकातले नामवंत चित्रपट निर्माते होते.
हेही वाचा : सलमान खानच्या भावोजीच्या घरात आहे चालणारी भिंत, प्रात्यक्षिक पाहून फराह खानही झाली आश्चर्यचकित, पाहा VIDEO
दरम्यान, काही दिवसांपासून अनिरुद्ध हा त्याच्या आणि सनराइजर्स हैदराबादच्या चीमची मालकिण काव्या मारनमुळे चर्चेत होता. ते दोघं लग्न बंधनात अडकणार आहेत अशी चर्चा होती. पण त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे.