Marathi News> मनोरंजन
Advertisement

KBC 13 ला मिळाला दुसरा करोडपती, सर्वांपेक्षा 'का' होतेय त्याची चर्चा

 ७ कोटीच्या प्रश्नाचं देता येणार का उत्तर?

KBC 13 ला मिळाला दुसरा करोडपती, सर्वांपेक्षा 'का' होतेय त्याची चर्चा

मुंबई : कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorpati 13) चे 13 वे सिझन सुरू आहे. हे सिझन सध्या स्पर्धकांमुळे चर्चेत आहे. सोनी टीव्हीवर प्रसारित होत असलेल्या या सिझनमध्ये आतापर्यंत फक्त एका महिलेने एक करोड रुपयांची रक्कम जिंकली आहे. मात्र सोनी टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोवरून कळतंय की, या सिझनमध्ये त्यांना दुसरा करोडपती मिळाला आहे. मात्र आता ही व्यक्ती ७ करोडच्या प्रश्नाचं उत्तर देतोय की नाही याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे.  

20-21 ऑक्टोबर रोजी प्रसारित होणाऱ्या भागात, एक व्यक्ती एक कोटीची रक्कम जिंकणार आहे. एक कोटी जिंकल्यानंतर शोचे होस्ट अमिताभ बच्चन त्या व्यक्तीला 7 कोटींचा प्रश्न विचारतात, पण हा प्रश्न ऐकून या व्यक्तीला आश्चर्य वाटते. या स्पर्धकाच्या नावाचा शोच्या प्रोमोमध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

७ करोड रुपयांकरता कसा असेल प्रश्न? 

मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसलेली व्यक्ती प्रश्न ऐकल्यानंतर विचारात पडते. 'कौन बनेगा करोडपती' च्या सात कोटींच्या प्रश्नाचे उत्तर देणे कोणत्याही स्पर्धकासाठी सोपे काम नाही. प्रोमोमध्ये एक कोटी रुपये जिंकणाऱ्या या व्यक्तीला अमिताभ बच्चन देखील प्रोत्साहित करताना दिसत आहेत. या हंगामाच्या सुरुवातीला हिमानी बुंदेला 1 कोटी रुपये जिंकण्यात यशस्वी झाली होती. पण ती 7 कोटीचे अचूक उत्तर देऊ शकली नाही.

७ करोडकरता विचारला हा प्रश्न

हिमानी बुंदेला यांना प्रश्न विचारण्यात आला: लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये डॉ बी आर आंबेडकर यांनी सादर केलेल्या प्रबंधाचे शीर्षक काय होते ज्यासाठी त्यांना 1923 मध्ये डॉक्टरेट प्रदान करण्यात आली?

A. भारताच्या इच्छा आणि साधन

B. रुपयाची समस्या

C. भारताचा राष्ट्रीय लाभांश

D. कायदा आणि वकील

बरोबर उत्तर: पर्याय 'B' म्हणजे 'रुपयाची समस्या'

Read More