Marathi News> मनोरंजन
Advertisement

गृहिणी करोडपती झाली आणि आणखी पैसे जिंकण्यासाठी...

सर्व लक्ष मुलाबाळांच्या संगोपनावरच केंद्रीत

गृहिणी करोडपती झाली आणि आणखी पैसे जिंकण्यासाठी...

मुंबई : स्वप्नांना कष्टाचं बळ मिळाल्यास अशक्यही शक्य होतं, याची कैक उदाहरणं आपण आजवर पाहिली आहेत. एखाद्या प्रेरणास्त्रोताबाबत जाणून घेताना अशा संदर्भांचा उल्लेख केला जातो. सध्या अशाच एका कहाणीनं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. 'कौन बनेगा करोडपती'13 चा मंच यासाठी निमित्त ठरला. 

बिग बींच्या समोर असणाऱ्या हॉट सीटवर एक गृहिणी बसली, आणि तिनं इथं किमयाच गेली. 1 कोटी रुपयांचं बक्षीस जिंकत या महिलेनं सर्वांसमोर एल आदर्शच प्रस्थापित केला. 

53 वर्षीय गीता यांनी स्वत:ची ओळख करुन देताना आतापर्यंतच्या जीवनात आपण सर्व लक्ष मुलाबाळांच्या संगोपनावरच केंद्रीत केल्याचं सांगितलं. 

जीवनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र गीता स्वत:साठी जगू इच्छितात, आयुष्याचा मनमुराद आनंद घेऊ इच्छितात. गीता जीप चालवून अनेकांना थक्क करतात, तर घरात सर्वांची काळजी घेतं अनेकांचं मनही जिंकतात. 

गीता यांच्या रुपात यंदाच्या वर्षी केबीसीला तिसरी करोडपती विजेती मिळाली आहे. गीता सिंह गौर या फक्त करोडपतीच्या विजेत्याच नसून, त्या खऱ्या अर्थानं सर्वच गृहिणींपुढे एक आदर्श प्रस्थापित करत आहेत. आपल्या ज्ञानाच्या आणि तल्लख बुद्धिच्या बळावर त्यांनी आज हा टप्पा गाठला आहे. जीवनात इतक्यावरच न थांबता आणखीही लांबचा पल्ला गाठण्याची स्वप्न त्या उराशी बाळगून आहेत. समस्त गृहिणी वर्गासाठी ही एक मोठी प्रेरणाच... नाही का? 

Read More