Marathi News> मनोरंजन
Advertisement

KBC 16 : Chess संदर्भातील 10 हजारांच्या प्रश्नचं उत्तर चुकला तरी 'तो' IITian 25 लाख जिंकला; तुम्हाला माहितीये का उत्तर?

Amitabh Bachchan KBC 16 : अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती 16' या शोमध्ये हजेरी लावलेल्या IITian ला देता आलं नाही 10 हजारांच्या प्रश्नचं उत्तर तरी 25 लाख जिंकला

KBC 16 : Chess संदर्भातील 10 हजारांच्या प्रश्नचं उत्तर चुकला तरी 'तो' IITian 25 लाख जिंकला; तुम्हाला माहितीये का उत्तर?

Amitabh Bachchan KBC 16 : 'कौन बनेगा करोडपती' च्या 16 व्या सीझनची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. खरंतर, फक्त याच सीझनची अशी नाही तर या आधीचे देखील सगळेच सीझन हे चर्चेत असायचे. त्याचं कारण म्हणजे या शोमधून अनेक वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळतं. या कार्यक्रमात हॉटसीटवर बसणं हे सहज होत नाही. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमध्ये हैदराबादचे एमएसवीएस साई पृथ्वी बसले होते. पण ते 10 हजार रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही. 

हैदराबादचे राहणारे पृथ्वी आयआयटी रुडकीमधून पास आउट झाल्यानंतर आयआयएम बंगळुरुमधून त्यांनी MBA चं शिक्षण पूर्ण केलं. साई पृथ्वी यांना CAT मध्ये 99.98 टक्के मिळाले होते. असं असलं तरी ते 10 हजार रुपयांसाठी असलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही. तरीसुद्धा पृथ्वी केबीसीमध्ये 25 लाख रुपये जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 10 हजार रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही तर 25 लाख रुपये कसे जिंकले. खरंतर, अमिताभ बच्चननं पृथ्वी यांना जो प्रश्न विचारला होता तो ‘सुपर संदूक’ होता. त्यात ते पटपट प्रश्न विचारतात आणि हॉटसीटवर बसलेली व्यक्ती जितक्या पटकन होत असेल तितक्या पटकन त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून ते कमीत कमी 40000 रुपये तरी जिंकू शकतील. त्यामुळे ते त्यांची एक लाईफलाईन पुन्हा मिळवतात. पृथ्वीला जो प्रश्न विचारण्यात आला तो नुकत्याच झालेल्या टाटा स्टील चेस टूर्नामेंट 2025 वर आधारीत होता.

अमिताभ बच्चन यांनी पृथ्वीला विचारलं की टाटा स्टील चेस टूर्नामेंट 2025 ला कोणत्या भारतीयनं जिंकलं होतं. प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 4 ऑप्शन होते. 
A) डी गुकेश
B) अर्जुन इरिगॅसी
C) विश्वनाथन आनंद 
D) आर प्रज्ञानंद

पृथ्वी यांनी उत्तर दिलं की डी गुकेशचं नाव घेतलं आणि त्याचं उत्तर हे चुकीचं निघालं. त्यानंतर अमिताभ यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगितलं आहे की टाटा स्टील चेस टूर्नामेंट 2025 ला आर प्रज्ञानंद यांनी जिंकलं होतं. 

हेही वाचा : भर कार्यक्रमात रेखा यांनी अक्षयला केलं Ignore, अभिषेक बच्चनला मारली मिठी; वारंवार पाहिला जातोय व्हिडीओ

अमिताभ बच्चन पुढे प्रश्न विचारण्या आधी पृथ्वी यांना त्यांच्या नावाचं फुल फॉर्म काय आहे ते विचारतात? त्यावर उत्तर देत पृथ्वी म्हणाले,  मादीराजू शेषा वेंकटा सत्या साई पृथ्वी असं आहे. त्यांनी हे देखील सांगितलं की त्यांच्या आईनं त्यांचं नाव इतकं मोठं का ठेवलं. त्यानंतर केबीसीमधून जिंकलेल्या पैशांचं काय करणार याविषयी देखील पृथ्वी यांनी सांगितलं. साई पृथ्वी हे केबीसीमध्ये जिंकलेल्या पैशानं शिक्षणासाठी घेतलेलं 30 लाखाचं लोन परतफेड करण्याचा प्रयत्न करणार आहे. 

Read More