Marathi News> मनोरंजन
Advertisement

Kedarnath Trailer : ...म्हणून आला 'तो' महाप्रलय

प्रेमाला श्रद्धेची जोड मिळाली खरी पण.....

Kedarnath Trailer : ...म्हणून आला 'तो' महाप्रलय

मुंबई : एखाद्या देवस्थानाप्रती असणारी ओढ आणि त्याविषयी प्रत्येकाच्याच मनात असणारी श्रद्धेची भावना या सर्व गोष्टी दिग्दर्शित अभिषेक कपूर याने अचूकपणे हेरत एका सत्यघटनेला प्रेमकहाणीच्या रुपात प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा निर्णय घेतला. केदारनाथ असं या चित्रपटाचं नाव असून, काही दिवसांपूर्वीच त्याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 

सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत याच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून केदारनाथ मंदिर परिसरात काही वर्षांपूर्वी आलेल्या महाप्रलयाच्या आठवणीही या चित्रपटाच्या निमित्ताने डोळ्यांसमोर उभ्या राहत आहेत. 

अशा या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

अवघ्या काही मिनिटांच्या या ट्रेलरमधून सारा आणि सुशांतची केमिस्ट्री विशेष लक्ष वेधत आहे. तर, अभिषेकच्या दिग्दर्शन कौशल्याविषयी प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करत आहे. 

केदरानाथ यात्रा, यात्रेकरु आणि धर्माच्या नावावर होणारं राजकारण या साऱ्या गोष्टी अभिषेक कपूरने या चित्रपटाच टीपल्याची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे सारा अली खानचा अभिनय यात विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे येत्या काळात अभिनेत्री म्हणून ती प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ७ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटरुपी यात्रेवर जाण्यासाठी प्रेक्षकांना आता थोडी वाट पाहावी लागणार हे खरं. 

Read More