Marathi News> मनोरंजन
Advertisement

Controversy : चितळेंची केतकी, पाटलांची गौतमी आणि जावेदांची उर्फी... या पोरींनी राजकारण्यांनाही केलंय परेशान

 केतकी चितळे(Ketaki Chitale), गौतमी पाटील( Gautami Patil ) आणि उर्फी जावेद(Urfi Javed ) यांची नाव माहित नाहीत असं कुणीतरी क्वचितच सांगेल. बेधडक वक्तव्य आणि थेट राजकीय नेत्यांशी पंगा घेणारी केतकी चितळे. आपल्या डान्सने अख्या महाराष्ट्राला वेड लावाणारी गौतमी पाटील. कुणी कितीही काही बोलले तरी आपली स्टाईल न बदलणारी उर्फी जावेद. या पोरींनी आता राजकारण्यांच्याही नाकी नऊ आणले आहे.

Controversy : चितळेंची केतकी, पाटलांची गौतमी आणि जावेदांची उर्फी... या पोरींनी राजकारण्यांनाही केलंय परेशान

Controversy : चितळेंची केतकी, पाटलांची गौतमी आणि जावेदांची उर्फी... या तिघींनी सध्या  ऐन थंडीत माहौल गरम केला आहे. केतकी चितळे(Ketaki Chitale), गौतमी पाटील( Gautami Patil ) आणि उर्फी जावेद(Urfi Javed ) यांची नाव माहित नाहीत असं कुणीतरी क्वचितच सांगेल. बेधडक वक्तव्य आणि थेट राजकीय नेत्यांशी पंगा घेणारी केतकी चितळे. आपल्या डान्सने अख्या महाराष्ट्राला वेड लावाणारी गौतमी पाटील. कुणी कितीही काही बोलले तरी आपली स्टाईल न बदलणारी उर्फी जावेद. या पोरींनी आता राजकारण्यांच्याही नाकी नऊ आणले आहे.

अतरंगी ड्रेसमुळे उर्फी कायम चर्चेत

अतरंगी ड्रेसमुळे उर्फी जावेद कायम चर्चेत असते. सोशल मीडियातील हीच वादग्रस्त अभिनेत्री ऊर्फी जावेद आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचातला वाद टोकाला गेला. जिथे सापडेल तिथे उर्फी जावेदला चोप देण्याचा इशारा चित्रा वाघांनी दिलाय. भर रस्त्यावर अतरंगी कपडे घालून फिरणा-या ऊर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवून अटक करण्याची मागणी केली. उर्फी जावेदला विरोध नाही तर तिच्या कृतीस विरोध असल्याचं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं. रस्त्यावर उघडं नागडं फिरणं मान्य नसल्याचं त्या म्हणाल्या. यानंतर ट्विट करत उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला.  चित्रु म्हणत.... उर्फी जावेदने त्यांना मैत्रीची ऑफर दिली आहे. तसेच संजय आठवतो का? असं म्हणत उर्फीने थेट संजय राठोड यांच्या नाव घेत चित्रा वाघ यांना डिवचले.  दुसरीकडं शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्या वादात उडी घेतलीय.उर्फी जावेदच्या वेशभूषेवर आक्षेप घेणा-यांनी कंगना राणावत, केतकी चितळे यांच्या वेशभूषेवर आक्षेप घेऊ शकाल का असा सवाल विचारलाय.

थेट शरद पवारांशी पंगा घेणारी केतकी चितळे

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा थेट शरद पवारांशी पंगा घेणारी केतकी चितळे. शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे केतकी चितळेला चांगली महिनाभर जेलची हवा खावी लागली होती. यानंतरही केतकीची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. थर्टी फर्स्टला शुभेच्छा देताना हातात दारुचा ग्लास घेऊन केतकीनं, वादग्रस्त पोस्ट केली. मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ. लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब 100% गलत है. माझा तिरस्कार करणाऱ्या सगळ्यांना माफ करा अशी पोस्ट केतकीने केली होती. कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या शुभेच्छा न दिल्याने केतकी चांगलीच ट्रोल झाली होती.

अश्लिल डान्समुळे गौतमी पाटील वादात  

गौतमी पाटीलने आपल्या डान्सने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. गौतमी पाटीलच्या एका डान्स कार्यक्रमांना तुफान गर्दी होत आहे. अश्लील डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. यावरुनच गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमांवर बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे. सांगली येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी गौतमीवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. 
अश्लील डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील चर्चेत आलेय. गौतमी तिच्या डान्सचे छोटे छोट्या क्लिप सोशल मीडियावर शेअर करत असते. अंगविक्षेप करुन नाचतानाचे गौतमी पाटीलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाले आहेत. मी आता अश्लिल काही करत नाही असं स्पष्टीकरण गौतमीने दिले आहे. 

 

Read More