Marathi News> मनोरंजन
Advertisement

खुशबु-संग्राम पुन्हा एकदा होणार आई-बाबा; शेअर केली Good News

अभिनेत्री खुशबु तावडे दुसऱ्यांदा आई होणार असून तिने ही गुड न्यूज शेअर करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

खुशबु-संग्राम पुन्हा एकदा होणार आई-बाबा; शेअर केली Good News

सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून प्रेक्षकांच मनोरंजन करणारी अभिनेत्री खुशबू तावडे. खुशबु लवकरच या मालिकेतून निरोप घेणार आहे. मालिका सोडण्याचं कारण देखील अगदी तसंच खास आहे. खुशबु आणि संग्राम लवकरच दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे. 

खुशबु आणि संग्रामने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे. या दोघांनी 2018 मध्ये लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये पहिल्या मुलाला जन्म दिला. आता या दोघांनी दुसऱ्या बाळाची गोड बातमी शेअर केली आहे. जवळपास सात महिने काम केल्यानंतर खुशबुने ही बातमी शेअर केली आहे. 

खुशबु तावडेचा खास व्हिडीओ 

या व्हिडीओमध्ये पहिला संग्राम येतो. त्याची जन्मतारीख ही 1984 आहे. त्यानंतर खुशबु तिची जन्मतारीख ही 1987 आहे. यानंतर त्यांचा मुलगा 2021 साली मुलाचा जन्म दाखवला आहे. यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये आणखी एक बाळ कुटुंबात सहभागी होणार असल्याचं या व्हिडीओत दाखवलं आहे. 

खुशबू तावडे ही गरोदरपणामुळे मालिकेचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. खुशबू दुसऱ्यांदा गरोदर आहे. खुशबूला एक मुलगा असून त्याचे नाव राघव असं आहे.  गरोदरपणात सात महिने खुशबूने शूटिंग केलं आहे. मात्र आता तिला आरामाची गरज असल्याने तिने ब्रेक घेतला असल्याचं सांगितलं आहे. 

  मालिकेत खुशबुची जागा कोण घेणार? 

'सारं काही तुझ्यासाठी' या मालिकेतील उमाचा प्रवास आता खुशबु थांबवणार असून पल्लवी वैद्य पुढचा प्रवास सांभाळणार आहे. मला प्रचंड आनंद होतोय की पल्लवी सारखी एक उत्तम कलाकार ही भूमिका साकारणार आहे. माझी कायम ह्या मालिकेसाठी ही इच्छा आहे की मालिकेचा पुढचा प्रवास सुंदर होऊ दे कारण मला 'सारं काही तिच्यासाठी' ने भरभरून दिले आहे. जरी मालिकेला मी आता निरोप देत असली तरीही मालिकेवर माझा तितकाच जीव असणार आहे', असं खुशबूने म्हटलं. 

Read More