Marathi News> मनोरंजन
Advertisement

Kiara Advani नववधुच्या रुपात, गुपचुप उरकलं लग्न?

कियारा आडवाणी अडकली लग्नबंधनात, अगदी खासगी सोहळा? 

Kiara Advani नववधुच्या रुपात, गुपचुप उरकलं लग्न?

मुंबई : अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani)चे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे फोटो कियाराच्या चाहत्यांना गोंधळात टाकणारे आहेत. गेल्या काही दिवसांपासून कियाराच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातच हे फोटो म्हणजे बातमीला शिक्कामोर्तबच मिळतो की काय? असं झालं आहे. 

कियारा आडवाणीचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री नववधुच्या जोड्यात दिसत आहे. हातावार छान मेंहदी लागली आहे. हे फोटो इतके व्हायरल झाले की, कियाराच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. 

कियाराचे हे फोटो एका ऍड शूटसाठी काढण्यात आले आहेत. कियारा एका जाहिरातीत वधूच्या भूमिकेत दिसणार आहे. अशा परिस्थितीत तयार झाल्यानंतर त्याचे काही फोटो क्लिक झाले जे सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहेत.

मेहंदी आर्टिस्ट वीना नगाडासोबत फोटो 

कियारा अडवाणीचे हे फोटो मेहंदी कलाकार वीणा नागाराने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. वीणा नगारा ही बॉलीवूडच्या प्रत्येक अभिनेत्रीच्या हातावर मेहंदी लावण्यासाठी पहिली पसंती असते. 

मग ते लग्न असो किंवा कोणतेही शूटिंग. या फोटोंमध्ये वीणा कियारासोबत दिसत आहे आणि कियारा तिच्या हातावर मेहंदी दाखवत आहे.

कियाराचं या बॉलिवूड अभिनेत्यासोबत खास रिलेशन 

कियारा अडवाणीही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या तिच्या नात्यामुळे ही अभिनेत्री बऱ्याच काळापासून धाकधूक आहे. तसेच ही जोडी चाहत्यांनाही खूप आवडते.

'शेरशाह' चित्रपटात सिद्धार्थ आणि कियारा एकत्र दिसले होते. या चित्रपटातही या जोडीला चांगलीच पसंती मिळाली होती.

Read More