Marathi News> मनोरंजन
Advertisement

'डॉन 3' मधून कियारा अडवाणी बाहेर; आता 'ही' अभिनेत्री रणवीर सिंगसोबत 'लेडी डॉन'च्या भूमिकेत?

कियारा अडवाणीने 'डॉन 3' मधून माघार घेतली आहे. आता रणवीरसोबत 'डॉन 3' मध्ये कोण होणार 'रोमा'? जाणून घेऊयात कोण आहे ही चर्चेत असलेली अभिनेत्री.

'डॉन 3' मधून कियारा अडवाणी बाहेर; आता 'ही' अभिनेत्री रणवीर सिंगसोबत 'लेडी डॉन'च्या भूमिकेत?

Don 3: रणवीर सिंग 'डॉन 3' या ब्लॉकबस्टर फ्रँचायझीमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 1978 मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन यांच्या 'डॉन'पासून सुरू झालेली ही फ्रँचायझी नंतर शाहरुख खानच्या दोन भागांमधून सुपरहिट ठरली. आता रणवीर सिंगने या आयकॉनिक भूमिका स्वीकारला आहे.

कियारा अडवाणीची एक्झिट, क्रिती सॅननची एन्ट्री?
सुरुवातीला कियारा अडवाणी ही रणवीरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार होती. मात्र, तिच्या प्रेग्नेंसीमुळे आणि प्रसूती रजेमुळे तिला 'डॉन 3'मधून बाहेर पडावे लागले. त्यामुळे निर्मात्यांनी दुसऱ्या अभिनेत्रीची शोधाशोध सुरू केली आणि शेवटी त्यांच्या नजरा थांबल्या त्या क्रिती सॅननवर.

क्रिती सॅननची 'रोमा'च्या भूमिकेत एन्ट्री
चित्रपटातील 'रोमा' ही महिला मुख्य भूमिका अत्यंत प्रतिष्ठित मानली जाते. पूर्वी ही भूमिका झीनत अमान आणि नंतर प्रियंका चोप्राने निभावली होती. आता क्रिती सॅननकडे ही व्यक्तिरेखा सोपवली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओने वाढवल्या चर्चा
अलीकडेच क्रिती सॅननचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ती निळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसते. पापाराझींनी तिला विचारले, 'क्रिती जी, डॉन 3, लेडी डॉन!' यावर क्रिती फक्त गालातल्या गालात हसू लागते. मात्र, तिच्या या स्मितहास्यानेच अफवा अधिक पक्क्या वाटू लागल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

फरहान अख्तर आणि डॉन फ्रँचायझी
'डॉन 3' दिग्दर्शक फरहान अख्तरच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे. त्यानेच 'डॉन' या फ्रँचायझीला नव्याने 2006 मध्ये पुनरुज्जीवित केले होते. आता रणवीर सिंगसह नव्या जोडीसह हा तिसरा भाग साकारण्यात येणार आहे, जो आणखी अ‍ॅक्शन-पॅक्ड, स्टायलिश आणि आधुनिक असेल.

हे ही वाचा: अक्षय-रेखा यांच्या अफेअरची सुरुवात 'या' हिट चित्रपटातून? 29 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा आजही आहे चर्चेत!

चाहत्यांकडून प्रतिक्रिया
कियारा अडवाणीच्या एक्झिटवर काही चाहते नाराज दिसले. मात्र क्रिती सॅननची निवड ऐकून अनेकांनी आनंदही व्यक्त केला आहे. काहींनी तिला 'परफेक्ट फिट' तर काहींनी 'स्मार्ट आणि स्ट्रॉंग लेडी डॉन' असे म्हटले.

'डॉन 3' ची रिलीज डेट आणि अधिकृत घोषणा कधी?
सध्या 'डॉन 3'च्या अधिकृत कास्टिंगबाबत निर्मात्यांकडून कोणतीही घोषणा झालेली नाही. मात्र, चित्रपट 2026 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. पुढील काही महिन्यातंच चित्रपटाचे टीझर किंवा फर्स्ट लूक येण्याची शक्यता आहे.

Read More