Kiara Advani on Kids : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी या दोघांनी नुकतीच एक गूड न्यूज चाहत्यांना दिली आहे. तेव्हा पासून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचं आपण पाहतोय. त्यासगळ्यात आता कियाराचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये कियारानं तिच्या मुलांविषयी बोलताना दिसली. तिला विचारण्यात आलं की जर ट्विन्स झाले तर दोघे मुलं हवेत किंवा दोन्ही मुली? किंवा एक मुलगा आणि एक मुलगी? या प्रश्नाचं उत्तर देताना कियारा असं काही बोलून गेली की करीना नंतर तिला चिडवू लागली. आता हा थ्रो बॅक व्हिडीओ लोकांचं पुन्हा एकदा लक्ष वेधून घेणार आहे.
कियारा आडवाणीचा 'गूड न्यूज' हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला होता. त्यावेळी चित्रपटाचं प्रमोशन करताना ही मुलाखत झाली होती. या मुलाखतीच्या वेळी चित्रपटातील इतर कास्ट अर्थात तिचे सहकलाकार अक्षय कुमार, करीना कपूर आणि दिलजीत दोसांझ देखील यावेळी तिथे होते. व्हिडीओमध्ये हे चौघ काऊचवर आरामात बसले होते. तेव्हाच समोरून एका व्यक्तीनं कियाराला प्रश्न विचारला. सुरुवातीला हा प्रश्न ऐकल्यानंतर कियारा थोडी लाजली.
Throwback to Goodnewz promotions when Kiara was asked about having a baby
byu/Dazzling_Complex5897 inBollyBlindsNGossip
कियाराला प्रश्न विचारण्याच आला की जर ट्विन्स झाले तर दोघे मुलं हवेत किंवा दोन्ही मुली? किंवा एक मुलगा आणि एक मुलगी? त्यावर उत्तर देत कियारानं सांगितलं की मला फक्त निरोगी मुलं हवी आहेत. हे ऐकताच शेजारी असलेली करीना हसताना दिसली. ती म्हणाली 'आणि मिस क्राउन तुला मिळतो.' तेव्हा समोरून बोलतो की 'असं उत्तर दिलं जसं काय हे मिस यूनिव्हर्स देते. त्यावर कियारा म्हणाली, 'एक मुलगा आणि एक मुलगी. एकत्र.'
हेही वाचा : 'फिल्ममेकर होण्यापेक्षा IAS होणं सोपं', संदीप रेड्डी वांगाचा विकास दिव्यकीर्तींवर निशाणा; कारण...
दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थनं 28 फेब्रुवारीला प्रेग्नंसीची घोषणा केली. त्यानंतर कियारा मुंबईमध्ये स्टूडियोमध्ये व्हॅनिटी व्हॅनजवळ सिंपल आणि क्लासी लूकमध्ये दिसली. कियारानं पांढऱ्या रंगाचं लूज शर्ट परिधान केलं होतं आणि शॉर्ट्स. चेहऱ्यावर गॉगल्स आणि नो मेकअप लूक मध्ये आहे. तर कियाराच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो स्पष्ट दिसतोय. या दोघांचं लग्न 2 वर्षांपूर्वी झालं होतं. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये त्या दोघांनी लग्न केलं होतं.