Marathi News> मनोरंजन
Advertisement

सिद्धार्थसोबत ब्रेकअपनंतर Kiara Advani चं मोठं वक्तव्य, तुम्हालाही बसेल धक्का

सिद्धार्थच्या पोस्टनंतर कियाराने आता केलेलं वक्तव्य चर्चेत..., अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल  

सिद्धार्थसोबत ब्रेकअपनंतर Kiara Advani चं मोठं वक्तव्य, तुम्हालाही बसेल धक्का

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणीचं  ब्रेकअप झाल्याची सध्या चर्चा रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून कियारा एका कारणामुळे चर्चेत आहे. रंगणाऱ्या चर्चेमागे कारण आहे ते म्हणजे.. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत असलेलं कियाराचं नातं. सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा तुफान रंगल्या. आता कियाराने एक मोठं वक्तव्य  केलं आहे. 

सध्या कियारा आगामी 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमा प्रमोशन दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

यावेळी कियाराला एक प्रश्न विचारण्यात आला, 'तुझा भूल भुलैया प्रदर्शित होत आहे, तर तुला जीवनातून कोणाला विसरायचं असेल, तर कोणाला विसरशील?' असा प्रश्न विचारल्यानंतर ती काही सेकंद शांत राहिली पण तिने उत्तर दिलं. 

कियारा म्हणाली, 'मी कोणालाचं नाही विसरणार.. मी माझ्या जीवनात कोणाला विसरत नाही.. कारण प्रत्येकाच्या सहवासात मी काही तरी नवीन शिकली आहे... त्यामुळे मी कोणालाचं नाही विसरणार...'

दरम्यान,  'शेरशाह' सिनेमातील कियारा आणि सिद्धार्थ त्यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. पण आता दोघांचे  मार्ग वेगळे झाले असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसत आहे. 

'भूल भुलैया 2' सिनेमा कधी प्रदर्शित होणार.... 
अनिस बाजमी दिग्दर्शित 'भूल भुलैया २' सिनेमात कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यनसोबत राजपाल यादव, संजय मिश्रा आमि तब्बू देखील दिसणार आहे.  सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 20 मे 2022 ला 'भूल भुलैया 2'चा थरार बॉक्स ऑफिसर धडकणार आहे. 

Read More