नवी दिल्ली : सध्या इंटरनेटवर किकी चॅलेंजचीच चर्चा आहे. आपल्या चालत्या चार चाकी गाडीतून उतरुन किकीच्या गाण्यावर डान्स करुन तो व्हिडिओ अपलोड केला जात आहे. यावर लाईक्स आणि कमेंट्सचा बाजाज पाहायला मिळतोयं. प्रत्येकजण स्वत:च्या स्टाईलने हा व्हिडिओ बनवतोय. पण आता किकी चॅलेंज कार आणि बाईकपुरतं मर्यादित राहिलं नाहीए. ते आता विमानातूनही किकी चॅलेंजसमोर आलंय.
या व्हिडिओमध्ये चालत्या विमानातून महिला उतरते आणि फ्लाइट अटेंडटसोबत डान्स करु लागते. पायलट अलेजांद्र मन्नीक्यूज आपल्या उड्डाण परिचालिकेसोबत माय 'फिलिंग्स' या गाण्यावर डान्स करताना दिसतेय.
#kiki dance in pilots way pic.twitter.com/62zKlz58fx
— Aviationdaily (@Aviationdailyy) August 28, 2018
Behind the scenes !!
— Aviationdaily(@Aviationdailyy) August 30, 2018
This is How it’s actually happened pic.twitter.com/YrFEjpxoCU
व्हिडिओ ट्विटरवर अपलोड झाल्यानंतर २५ हजारापेक्षाही जास्त यूजर्सने पाहिलाय. या व्हिडिओवर लोक खूप साऱ्या प्रतिक्रियाही देत आहेत. काही लोकांनी हा व्हिडीओ खतरनाक असल्याचे म्हटले तर काहींनी खिल्लीही उडविली. महिलांनी परवानगी घेतली असेल आणि विमानात प्रवासी नसतील' असेही मस्करीत काहींनी म्हटलंय. व्हिडिओ बनवणारा कॅमेरामन प्लेनच्या गेटवर उभा आहे.