Marathi News> मनोरंजन
Advertisement

कसलं काय Private ? पतीपासून वेगळं होताच अभिनेत्रीची खास डेट, फोटो व्हायरल होताच....

...आणि सर्वांच्या नजरा त्यांच्याकडेच रोखल्या

कसलं काय Private ? पतीपासून वेगळं होताच अभिनेत्रीची खास डेट, फोटो व्हायरल होताच....

मुंबई : कलाजगतामध्ये दर दिवशी नवनवीन मुद्दे आणि विषयांसंदर्भातील चर्चांना वाव मिळतो. मुद्दा काहीही असो, त्याची चर्चा झाल्यावाचून राहत नाही. सध्या चर्चेसाठी विषय ठरतोय तो म्हणजे एका अभिनेत्रीची व्हायरल झालेली प्रायव्हेट डेट.

सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोइंग असणाऱ्या अभिनेत्री किम कार्दाशियन हिचं नाव सध्या अनेकांच्या तोंडावर आहे. कारण, हल्लीच तिनं प्रियकर पीट डेव्हिडसन याच्याशी असणारं आपलं नातं सर्वांसमोर आणलं.

किमनं फक्त रोमँटिक फोटोच शेअर केले नाहीत. तर, तिनं या फोटोंसाठी तितकंच खास कॅप्शनही दिलं.

किमनं शेर केलेल्या फोटोंमध्ये ती आणि तिचा प्रियकर रोमँटिक होताना दिसत आहेत. डिनर डेटवर गेलं असता त्या दोघांची केमिस्ट्री सर्वांच्या नजरा वळवत आहे.

‘रात्री उशिरापर्यंत मी स्कॅनिंग करतेय...’, अशा आशयाचं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं. चंदेरी रंगाच्या लो नेकलाईन असणाऱ्या ड्रेसमध्ये किम कमाल मादक दिसत होती. यावेळी प्रियकरावर तिची रोखलेली नजर पाहताना तिच्या कॅप्शनचा खरा अर्थ लक्षात आला.

किम आणि पीटच्या या रोमँटिंक फोटोंवर लाखोंच्या संख्येनं लाईक्स आणि हजारोंच्या संख्येनं कमेंट्स आल्या आहेत. किमची बहीण, क्लोई हिनंही या फोटोला लाईक करत त्यावर हार्ट शेप इमोजी पाठवत कमेंट केली आहे.

fallbacks

याहून आणखी गोड काही असू शकतं का, थांबा इथंच.. अशी कमेंट तिनं केली. किम आणि पीटच्या नात्याची सुरुवात ऑक्टोबर 2021 पासूनच झाली. तूर्तास या दोघांच्याही लग्नाचा वगैरे कोणताही बेत नसल्याचं स्पष्ट होत आहे.

दरम्यान, किमच्या या नात्याची माहिती तिच्या Ex husband ला आहे का, यावर त्याची काय प्रतिक्रिया अशाही काही कमेंट्स तिच्या आणि पीटच्या फोटोंवर करण्यात आल्या आहेत.

Read More