Marathi News> मनोरंजन
Advertisement

सेलिब्रिटीचा नको 'त्या' अवस्थेतला व्हिडीओ जेव्हा तिचा मुलगा पाहतो.....

बापरे! आघाडीच्या सेलिब्रिटीचा इंटिमेट व्हिडीओ तिच्या मुलाच्या हाती लागताच....   

सेलिब्रिटीचा नको 'त्या' अवस्थेतला व्हिडीओ जेव्हा तिचा मुलगा पाहतो.....

मुंबई : अमुक एक व्यक्ती जेव्हा सेलिब्रिटी ज्यावेळी अतिशय मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीझोतात येते त्यावेळी त्या व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित बऱ्याच गोष्टी चर्चेत येतात. किंबहुना अनेकदा या गोष्टी चर्चेत येण्यापेक्षा त्या सेलिब्रिटीसाठी मोठे अडथळे निर्माण करतात. एका अतिशय लोकप्रिय सेलिब्रिटीनं अशाच प्रसंगाचा सामना केला. 

ही सेलिब्रिटी आहे प्रसिद्ध मॉडेल किम कार्दशियन (Kim Kardashian Controversial Video). खुद्द किमनंच यासंदर्भातला खुलासा करत सर्वांना धक्का दिला. 

तो क्षण अतिशय आव्हानात्मक होता, कारण किमच्या मुलानं 2007 चा 'तो' वादग्रस्त व्हिडीओ पाहिला होता. ज्यामध्ये ती तिच्या प्रियकरासोबत इंटिमेट होताना दिसली होती. तिचा मुलगा सेन्ट आयपॅडमध्ये रोब्लॉक्स खेळत होता. 

त्याचवेळी त्यानं किमचे रडतानाचे मीम्स ट्रेंड करत असल्याचं पाहिलं. ज्यामध्ये काहीतरी बोललं जात होतं. तिच्या वादग्रस्त 'सेक्स टेप' संदर्भात तिथं काहीतरी बोललं जात होतं. 

काय म्हणाली किम? 
सदर प्रकरणी सांगताना किम म्हणाली, 'ते एक क्लिकबीट होतं. तुम्ही यावर क्लिक केलं असता एक नवी सेक्स टेप समोर येईल असं तिथं सांगितलं जात होतं. माझा मुलगा जरा मोठा असता आणि त्याला वाटता आलं असंतं तर मी पुरती संपलेच होते. पण, तेव्हाही मी आतल्या आत प्राण गमावले होते.'

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हॉलिवूड सेक्स टेप ब्रोकर Kevin Blatt नं दावा करत किमनं तिच्या सेक्स टेपच्या माध्यमातून गडगंज रक्कम कमावल्याचं म्हटलं होतं. तिच्या या कमाईचा आकडा 20 मिलियन डॉलर इतका असल्याचं सांगण्यात आलं. या व्हिडीओतून काही दृश्य हटवण्यातही आली होती. 

Read More