Marathi News> मनोरंजन
Advertisement

कियारा अडवाणीचं ट्विटर अकाउंट हॅक

'कोणत्याही चुकीच्या पोस्टकडे दुर्लक्ष करा'

कियारा अडवाणीचं ट्विटर अकाउंट हॅक

मुंबई : 'कबीर सिंग' चित्रपटाला प्रचंड यश मिळाल्यानंतर अभिनेत्री कियारा अडवाणीच्या पदरात अनेक चित्रपट आहेत. 'कबीर सिंग' चित्रपटानंतर तिच्या करियरला चांगलीच कालाटणी मिळाली आहे. कियारा सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. सध्या तिचा ट्विटर अकाउंट हॅक झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या गोष्टीची माहिती तिने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून दिली आहे. 

fallbacks

इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'माझं ट्विटर आकाउंट हॅक करण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या पोस्टकडे दुर्लक्ष करा.' असे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे. 

कियारा सध्या तिच्या अनेक आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. आगामी 'भूल भुलैया' चित्रपटात ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत झळकणार आहे. त्याचप्रमाणे कियारा लवकरच ‘लक्ष्मी बॉम्ब’,‘गुडन्युज’आणि ‘शेरशाह’ या चित्रपटात भूमिका साकारणार आहे.

Read More