Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानसोबतच्या या 'मिस्ट्री गर्ल'ला ओळखलं का?

'तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं' 

सलमानसोबतच्या या 'मिस्ट्री गर्ल'ला ओळखलं का?

मुंबई : 'स्वागत नही करोगे हमारा....', असं म्हणत सलमानने ज्याप्रमाणे चित्रपटात एंट्री घेतली, त्याचप्रमाणे यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यातही त्याची धमाकेदार एंट्री पाहायला मिळाली. 'तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं' असंच सलमान आयफा सोहळ्याला आला तेव्हा पाहायला मिळालं. यावेळी भाईजान सलमानची एक झलक टीपण्यासाठी कॅमेऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्याच. पण, त्यासोबतच त्याची ही एंट्री आणखी एका कारणामुळे सर्वांचं लक्ष वेधून गेली. 

यंदाच्या वर्षी या पुरस्कार सोहळ्याच्या दिमाखदार सोहळ्यासाठी सलमानसोबत कतरिना, सोनाक्षी नव्हे तर एक नवी सुंदरी पाहायला मिळाली. ज्यानंतर 'दबंग खान'सोबतची ही 'मिस्ट्री गर्ल' आहे तरी कोण, असाच प्रश्न अनेकांना पडू लागला. सोशल मीडियावरील चित्रपटांमध्येही ही आहे तरी कोण असंच अनेकजण विचारू लागले. 

हिंदी कलाविश्वातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता असणाऱ्या सलमानसोबत आयफामध्ये येण्याची संधी मिळालेली ही नवोदित अभिनेत्री आहे, सई मांजरेकर.

fallbacks

निर्माता- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई सलमानसोबत 'दबंग ३' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करत आहे. दणक्यात बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज असणाऱ्या सईची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरु आहे. इतकच नव्हे, तर तिच्या सोशल मीडिया फॉलोअर्सचा आकडाही दिवसागणिक वाढतच आहे. आयफाच्या निमित्ताने सई खऱ्या अर्थाने एका वेगळ्या अंदाजात सर्वांसमोर आली आणि तिच्या अदांनी सारेच घायाळ झाले हे खरं. 

fallbacks

fallbacks

२० डिसेंबरला सलमानचा 'दबंग ३' हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. राजस्थानातील चित्रीकरणानंतर आता चित्रपटातील उर्वरित भाग मुंबईत चित्रीत केला जात आहे. आतापासूनच या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Read More