Smriti Irani Kyuki Saas Bhi Kabhi Bahu Thi : स्टार प्लसवरील गाजलेली मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी' त्याच्या सीझन 2 ला घेऊन पुनरागमन करणार आहे. या मालिकेचा आता दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खरंतर ही माहिती जेव्हा पासून मिळाली आहे तेव्हा पासून प्रेक्षकांना आनंद झाला आहे. या मालिकेत दिसणाऱ्या कलाकारांमध्ये स्मृती इराणी आणि अमर उपाध्याय यांची नावं सहभागी आहेत. आता या मालिकेचा 2 सीझन येणार असून त्या संबंधीत काही अपडेट्स समोर आल्या आहेत. दुसरं पर्व हे पहिल्या सीझनला 25 वर्ष पूर्ण होतील त्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
जूमनं दिलेल्या वृत्तानुसार, या मालिकेचा दुसरा सीझन हा पहिल्या सीझनला 25 वर्ष ज्या दिवशी पूर्ण होती याचा अर्थ 3 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. कारण सास भी कभी बहू थी या मालिकेचा पहिला सीझन हा 3 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. तर याच दिवशी 2000 मध्ये मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला होता. शोच्या एपिसोडविषयी बोलायचं झालं तर पहिल्या सीझनमध्ये जवळपास 1800 एपिसोड होतो. कारण सास भी कभी बहू थीचा पहिला सीझन हा 2000 ते 2008 इतकी वर्ष स्टार प्लसवर सुरु होती. तर सीझन 2 हा इतक्या एपिसोडचा नसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या सीझनमध्ये 150 ते 200 एपिसोड असणार आहेत.
हेही वाचा : पाकिस्तानी सेंसर बोर्डाला 'दंगल' चित्रपटातून काढायचा होता 'तो' सीन; आमिर खाननं चित्रपट प्रदर्शनास दिला नकार
कारण 'सास भी कभी बहू थी'चा सीझन 2 चं सध्या प्रोडक्शन अर्थात निर्मिती सुरु आहे. ही मालिका सोमवार ते रविवारी रात्री 10.30 वाजता स्टार प्लसवर प्रदर्शित होणार आहे. पहिला सीझन देखील स्टार प्लसवर रात्री 10.30 वाजता प्रदर्शित व्हायचा. त्यामुळे आता ही माहिती मिळाल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे की कधी त्यांना ही मालिका पाहता येणार आहे. कारण अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती किंवा घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता खरं काय आहे कधी पहिला एपिसोड पाहता येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत. खरंतर पुन्हा एकदा स्मृती इराणी यांना तुलसीच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप आतुर आहेत.