Marathi News> मनोरंजन
Advertisement

8599 कोटींचा मालक... अवघ्या 13 वर्षात 'तो' झाला जगातील सर्वात श्रीमंत युट्यूबर; थक्क करणारा प्रवास

Richest Youtube in World: जगातील सगळ्यात श्रीमंत युट्यूबर; 13 वर्षांपूर्वी शेअर केला होता सगळ्यात पहिला युट्यूब आणि आज आहे 8599 कोटींच्या संपत्तीचा मालक.

8599 कोटींचा मालक... अवघ्या 13 वर्षात 'तो' झाला जगातील सर्वात श्रीमंत युट्यूबर; थक्क करणारा प्रवास

Richest Youtube in World:  सध्या या यूट्यूब आणि ऑनलाइन क्रिएशनच्या जगात सगळ्यात टॉपला कोणी आहे तर तो MrBeast आहे. MrBeast अर्थातच जिमी डोनाल्डसन हा अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना येथे राहणारा एक तरुण होता. त्यानं लहाण असताना MrBeast नावानं एक युट्यूब चॅनल सुरु केलं आणि आज तो अब्जाधीश झाला आहे. त्याच्या नेटवर्थची नेहमीच चर्चा करण्यात येते. Celebrity Net Worth नुसार, त्याची एकूण संपत्तीही आता 1 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे. अशा प्रकारे जगाच्या आठव्या सगळ्यात तरुण अब्जाधीश झाला आहे. तर तो एकमेव असा तरुण आहे ज्यानं वयाच्या 30 व्या वर्षी इतक्या संपत्तीचा मालक झाला आहे. 

MrBeast नं 13 व्या वर्षी MrBeast6000 नावानं एक युट्यूब चॅनल सुरु केलं. सुरुवातीला त्यानं गेमिंग व्हिडीओ रिअ‍ॅक्शन आणि युट्यूबरची संपत्ती किती असते अशी माहिती देणारा एक व्हिडीओ बनवला होता. 2017 मधील त्याचा 'I Counted to 100000' हा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ शूट करायला त्याला 44 तास लागले. तेव्हा त्याला झालेले चॅलेन्जेस आणि गिव्हअवे स्टाइलच्या व्हिडीओमुळे त्यांना एक ओळख मिळाली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MrBeast (@mrbeast)

2023 मध्ये त्यानं 223 मिलियन डॉलरची कमाई केली आणि 2024 मध्ये त्यानं 700 मिलियन डॉलर पर्यंतची कमाई केल्याचे म्हटले जाते. त्याच्या बिझनेस व्हेंचर्सबद्दल बोलायचं झालं तर MrBeast Burger: एक व्हर्च्युअल फास्ट फूड चेन आहे, ज्याची कमाई ही 2.3 मिलियन डॉलर महिना होती. त्याशिवाय त्याची Feastables नावाची चॉकलेट कंपनी आहे. ही कंपनी लॉन्चच्या काही महिन्यात 10 मिलियन डॉलर पेक्षा जास्त विक्री झाली. नवीन क्रिएटर्सना पाठिंबा देण्यासाठी Juice Funds नावानं तो त्यांना फंड देतो तर त्यानं आजवर 2 मिलियन डॉलरची मदत केली आहे. त्याशिवाय त्यानं क्रिप्टो आणि NFT मध्ये देखील गुंतवणूक केल्याचं म्हटलं जातं आणि त्याशिवाय Coinbase नावाच्या कंपन्यांशी तो जोडलेला आहे

MrBeast फक्त मनोरंजन करण्यापर्यंत मर्यादीत नाही. तर त्यानं Beast Philanthropy नावानं एक एनजीओ सुरु केला असून त्याच्या मदतीनं त्यानं 100 पेक्षा जास्त गाड्या दान केल्या आहेत. Team Trees च्या मदतीनं त्यानं 2 कोटी झाडं लावल्याचं अभिनय चालवलं. 2023 मध्ये त्यानं 1000 लोकांच्या डोळ्यांची मोफत सर्जरी करून दिली. त्यामुळे त्याला अनेकांनी ट्रोल देखील केलं. पण त्यानं पुढे म्हटलं की 'मरण्याच्या आधी मी माझी संपूर्ण संपत्ती ही दान करणार आहे.' 

हेही वाचा : 'त्यानं शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितलं अन्...'; नेहा पेंडसेला कामाच्या नावाखाली दिली घाणेरडी ऑफर

MrBeast चं युट्यूब चॅनल विषयी बोलायचं झालं तर ते जगातील सगळ्यात जास्त फॉलोवर्स असणारं चॅनल आहे. त्यानं त्याच्या व्हिडीओला स्पॅनिश, फ्रेंच, अरबी सारख्या 10 भाषांमध्ये डब करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता ही आंतरराष्ट्रीय स्थळावर पोहोचली आहे. 

Read More