Marathi News> मनोरंजन
Advertisement

Koffee With Karan 7 : अखेर सिद्धार्थ मल्होत्राने दिली प्रेमाची कबुली? या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये

बी टाऊनचा प्रसिद्ध टॉक शो 'कॉफी विथ करण' चांगलाच चर्चेत आहे. 

Koffee With Karan 7 : अखेर सिद्धार्थ मल्होत्राने दिली प्रेमाची कबुली? या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये

मुंबई : बी टाऊनचा प्रसिद्ध टॉक शो 'कॉफी विथ करण' चांगलाच चर्चेत आहे. विशेष म्हणजे करण जोहरच्या शोमध्ये आतापर्यंत बॉलिवूडचे अनेक दिग्गज पोहोचले आहेत. नुकताच या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. पुढच्या एपिसोडमध्ये बी टाऊनचा पंजाबी मुंडा, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विकी कौशलला आपल्याला पाहायला मिळणार आहे.

करण जौहरने स्टार्ससोबत केली मस्ती
अलीकडेच 'कॉफी विथ करण 7' चा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. शोचा प्रोमो शेअर करत एक मजेदार कॅप्शनही दिलं आहे.  या आठवड्यात बॉलिवूडचा हँडसम हंक्स सिद्धार्थ आणि विकी कौशलला शोमध्ये मनोरंजनाची जोड देण्यासाठी बोलावण्यात आलं आहे.

सिद्धार्थने कियारासोबतच्या नात्याची दिली कबुली
व्हिडिओच्या सुरुवातीलाच विकी कौशल म्हणतो की, हा कॉफी विथ करणचा पंजाबी भाग आहे. प्रोमोमध्ये करण सिद्धार्थ मल्होत्राला कियारा अडवाणीचं नाव घेऊन थेट प्रश्न विचारतो, 'तो या अभिनेत्रीला डेट करत आहे. तुम्ही दोघं  लग्नाची काही योजना करत आहात का? यावर सिद्धार्थ आपल्या एक्सप्रेशनसह अभिनेत्रीसोबतच्या नात्याची कबुली देताना दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आजकाल सिद्धार्थ आणि कियारा इंडस्ट्रीत चर्चेचा विषय आहेत. या स्टार कपलला अनेकदा एकत्र स्पॉट केलं जातं. आता सिद्धार्थ आणि कियारा त्यांच्या नात्याची अधिकृतपणे पुष्टी कधी करतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Read More