Marathi News> मनोरंजन
Advertisement

Video : कोमलच्या ठुमक्यांसमोर सपना चौधरीही फिकी? बोल्ड डान्सनं पाहणाऱ्यांनाही नाचवलं

सोशल मीडियावर आणखी एका डान्सरच्या व्हिडीओचा धुमाकूळ 

Video : कोमलच्या ठुमक्यांसमोर सपना चौधरीही फिकी? बोल्ड डान्सनं पाहणाऱ्यांनाही नाचवलं

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि युट्यूबच्या माध्यमातून हरयाणवी कलाकारांचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एकेकाळी सपना चौधरी हिच्याच नावाची चर्चा रंगत असताना आता मात्र तिला टक्कर देण्यासाठी काही कलाकार सज्ज झाल्या आहेत. किंबहुना त्यांची तुलना आतापासूनच सपनाशी होऊ लागली आहे. 

आर.सी उपाध्यायमागोमाग आता सपना चौधरी हिच्याशी कौमच चौधरी हिचीही तुलना केली जात आहे. नुकताच कोमलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये ती स्टेजवर दुसऱ्या एका डान्सरसोबत एकच कल्ला करताना दिसत आहे. 

हरयाणामध्ये कोमल चौधरी सध्या प्रकाशझोतात येणाऱ्या डान्सर्सपैकी एक आहे. तिचा हा नवा व्हिडीओ पाहता ते लक्षात येत आहे. यामध्ये ती बोल्ड डान्स करताना दिसतेय, तर पाहणाऱ्यांनाही आपल्या तालावर नाचवताना दिसतेय. कोमचा हा डान्स पाहताना पाहणाऱ्यांच्याही भुवया उंचावत आहेत. 

बिग बॉसनं दिली सपनाला लोकप्रियता.... 
हरयाणाची डान्सिंग क्वीन, सपना चौधरी हिला बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळं लोकप्रियता मिळाली होती. तिला देशभरात ओळखलं जाऊ लागलं. सपनाला पाहून अनेकांनीच या क्षेत्रात उडी घेतली आणि तिला स्पर्धा निर्माण झाली. असं असलं तरीही आपल्या सीमा ओळखत त्या कक्षेत राहतच डान्स करत सपनानं तिचं वेगळेपण सिद्ध केलं आहे. 

Read More