Marathi News> मनोरंजन
Advertisement

Krishna Janmashtami 2019 : 'या' सुपरहिट गाण्यांशिवाय दहीहंडीचा उत्साह अपूर्णच

हो आई माखन के चोरों की सेना.... 

Krishna Janmashtami 2019 : 'या' सुपरहिट गाण्यांशिवाय दहीहंडीचा उत्साह अपूर्णच

मुंबई : सण- उत्सव कोणताही असो, प्रत्येक सणाला साजेसं असं एकतरी गाणं बॉलिवूड चित्रपटामध्ये साकारण्यात येतं. सध्याच्या घडीला अशाच एका सणाची गाणी युट्यूबवर, सोशल मीडियावर आणि प्रत्येकाच्याच प्लेलिस्टमध्ये सर्वाधिक पसंती मिळवत आहेत. कित्येक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेली, तर काही हल्लीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही गाणी ऐकताना नकळच ऐकणाऱ्या व्यक्तीही त्यावर ठेका धरु लागतात. कारण ही गाणी आहेत, दहीहंडीच्या उत्साहाची.

दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांच्यापासून ते अगदी हल्लीच्या कलाकारांपर्यंत अनेकांनीच कृष्णाच्या लीला साजरा करत तरुणाईला एका वेगळ्या रुपात सर्वांसमोर आणणाऱ्या या गाण्यांवर ठेका धरला आहे. 'मच गया शोर सारी नगरी रे....' असं म्हणत दोरीवर टांगलेली हंडी फोडण्यासाठी येणाऱ्य़ांपासून ते 'मधुबन मे राधा किसी गोरी से मिले', असं म्हणत कृष्णावर नाराज असणाऱ्या राधेपर्यंत सारंकाही य़ा गाण्यांमध्ये सुरेल पद्धतीने सादर करण्यात आलं आहे. चला तर मग... नजर टाकूया अशाच काही गाण्यांवर...

गोविंदा आला रेssss

मनमोहन देसाई दिग्दर्शित ब्लफमास्टर या चित्रपटातून अभिनेता शम्मी कपूर यांनी अनोख्या आणि खऱ्या अर्थाने गोविंदांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अंदाजात हे गाणं सादर केलं होतं. हो आई माखन के चोरों की सेना.... असं म्हणत गल्लीबोळातून येणारं गोविंदापथक आणि इतक्या वर्षांनंतरही तितकंच लोकप्रिय असणारं हे गाणं पाहता जणू काही, ही एक प्रथाच आहे असं म्हणायला हरकत नाही.

मच गया शोर सारी....

अमिताभ बच्चन आणि सहकलाकारांच्या अदाकारीमध्ये साकारलेलं मच गया शोर हे गाणं ऐकताना आपोआपच पाय थिरकू लागतात. मनाला भावणारा ठेका आणि मन जिंकणारे कलाकार ही या गाण्याची जमेची बाजू.

हर तरफ है ये शोर....

संजय दत्त, शिवाजी साटम, रीमा लागू आणि इतर सहकलाकारांच्या भूमिका असणाऱ्या वास्तव या चित्रपटातील हर तरफ है ये शोर... हे गाणं आठवतंय का? चाळीत राहणाऱ्या तरुणांची टोळी हा उत्सव कसा साजरा करत आनंद लुटते याची झलक या गाण्याच पाहायला मिळते.

तीन बत्ती वाला, गोविंदा आला...

जन्माष्टमी आणि गोपाळकाला अशा दोन्ही दिवशी आवर्जून पसंती मिळणारं एक गाणं म्हणजे, तीन बत्ती वाला गोविंदा आला. सुनील दत्त, शत्रुघ्न सिन्हा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या 'मुकाबला' या चित्रपटातील हे गीत एकदा ऐकाच...

बोल बजरंग बली की जय...

धमाकेदार, उत्सफूर्त असं गोविंद्याच्या निमित्ताने हमखास वाजणारं एक गाणं म्हणजे बोल बजरंग बली की जय... लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुख्य भूमिका असणाऱ्या हमाल दे धमाल या चित्रपटातील गोविंदा.... रे गोपाळा हे गाणंही न चुकता कानांवर पडतं.

राधा कैसे न जले...

तगडी स्टारकास्ट असणाऱ्या लगान या चित्रपटातील राधा कैसे न जले या गाण्याची धुन सर्वांचंच मन जिंकते. सुमधूर अशी ही धून आणि गाण्याचे शब्द ऐकताना कृष्णाच्या लीला पाहून राधेच्या मनात नेमक्या काय भावना असतील याचा सहज अंदाज लावता येतो.

Read More