Marathi News> मनोरंजन
Advertisement

...म्हणून आईच्या अंत्यसंस्काराला ऋषी कपूर कुटुंबासहीत अनुपस्थित राहिले

अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्च, काजोल, रानी मुखर्जी यांसारखे बॉलिवूडमधले अनेक दिग्गजही अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले

...म्हणून आईच्या अंत्यसंस्काराला ऋषी कपूर कुटुंबासहीत अनुपस्थित राहिले

मुंबई : दिवंगत अभिनेते राज कपूर यांची पत्नी कृष्णा राज कपूर यांचं सोमवारी पहाटे ४ वाजल्याच्या सुमारास निधन झालं. मृत्यूसमयी त्या ८७ वर्षांच्या होत्या. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी, संपूर्ण कपूर कुटुंबीय उपस्थित झाले होते... अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्च, काजोल, रानी मुखर्जी यांसारखे बॉलिवूडमधले अनेक दिग्गजही अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले... परंतु, यात गर्दीत राज कपूर यांचा मुलगा ऋषी कपूर, त्यांची पत्नी नीतू कपूर आणि मुलगा रणबीर कपूर मात्र कुठेही दिसले नाहीत.

fallbacks
उरल्या फक्त आठवणी

त्याचं कारण ऋषी कपूर यांच्या एक दिवस अगोदरच्याच एका ट्विटवरून लक्षात येऊ शकेल. सोशल मीडियाद्वारे यांनी त्यांच्या फॅन्सना आपण काही वैद्यकीय कारणासाठी अमेरिकेला जात असल्याचं सांगितलं होतं. यावेळी, त्यांच्यासोबत रणबीर आणि नीतूही होत्या. आईच्या मृत्यूची यावेळी त्यांना कल्पनाही असण्याची शक्यता नव्हती. त्यामुळेच, आईच्या अंत्यविधीलाही ते उपस्थित राहू शकले नाहीत. 

fallbacks
कपूर अॅन्ड सन्स

अभिनेता रणबीरला जेव्हा आजीच्या निधनाची बातमी समजली तेव्हा तो ताबडतोब भारताकडे रवाना झाला. 

Read More