Kriti Sanon And Kabir Bahia Dating Rumours: बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन अलीकडेच तिच्या सुट्टीमुळे चर्चेत आली आहे. ती सध्या एका आलिशान क्रूझ ट्रिपवर असून, तिने तिथले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा स्टायलिश लूक आणि रिलॅक्स मूड पाहून चाहत्यांनी कौतुक केलं असलं, तरी त्या मागे वेगळाच चर्चेचा विषय सुरू झाला आहे.
फोटो शेअर करताच, पुन्हा एकदा तिचं नाव उद्योजक कबीर बाहियासोबत जोडलं जात आहे. कारण, कबीर बाहियाने देखील त्याच लोकेशनचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. दोघांनीही एकमेकांना फोटोमध्ये टॅग केलं नाही किंवा एकत्र फोटो टाकलेले नाहीत, परंतु बॅकग्राउंड, समुद्राचं दृश्य, क्रूझ आणि खाद्य पदार्थ हे सगळं बघून चाहत्यांना शंका आली की ते खरंच एकत्रच सुट्टी घालवत आहेत का?
कबीरने शेअर केलेल्या एका फोटोत तो क्रूझवर उभा असून, त्याच्या आजूबाजूला फक्त निळंशार समुद्र दिसतो. दुसऱ्या फोटोमध्ये त्याचा लंच सेटअप स्पष्टपणे दिसतो. तर क्रितीच्या फोटोंमध्ये ती रंगीबेरंगी ड्रेसमध्ये समुद्राकडे बघत उभी आहे. ती अगदी नॅचरल लूकमध्ये असून, कमीतकमी मेकअपमध्ये देखील तिचं सौंदर्य खुलून आलं आहे. दोघांच्या पोस्टवर काही चाहत्यांनी थेट विचारलं, 'तुम्ही दोघं डेट करतायत का?', 'क्रूझ ट्रिपवर एकत्र असणं योगायोग नाही', अशा कमेंट्स भरभरून आल्या. काहींनी तर, 'दोन फोटो एकत्र केले तर एकच लोकेशन दिसतंय', असंही कमेंट्समध्ये सांगितले.
क्रिती आणि कबीरच्या नात्याच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सतत रंगत आहेत. दोघे अनेकवेळा एकत्र इव्हेंट्समध्ये दिसले आणि कबीरच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये क्रितीची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही ते एकमेकांसाठी शुभेच्छा आणि कोट्स शेअर करताना दिसले आहेत. मात्र, अद्याप त्यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. इंडस्ट्रीतील काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हे दोघं खूप जवळचे मित्र आहेत, पण त्यांनी त्यांच्या नात्याला नाव दिलेलं नाही. मीडिया आणि चाहत्यांकडून मात्र सतत त्यांच्या अफेअरबद्दल चर्चा सुरू असते.
हे ही वाचा: इस्कॉनच्या शाकाहारी हॉटेलमध्ये चिकन खाल्ल्यावर भडकला बादशाह; म्हणाला, 'कोंबडीलाही लाज वाटेल'
क्रिती सेनन लवकरच 'डॉन 3' चित्रपटात झळकणार आहे. या बहुचर्चित चित्रपटात ती रणवीर सिंगच्या अपोझिट भूमिका साकारेल. या आधी ही भूमिका कियारा अडवाणीकडे होती, पण अलीकडे तिने एका गोड मुलीला जन्म दिल्याने हा प्रोजेक्ट तिला सोडावा लागला आणि त्यामुळेचं चित्रपटासाठी क्रितीची निवड झाली.
दरम्यान, क्रितीने तिच्या चाहत्यांना ही ट्रिप केवळ 'माझ्यासाठी वेळ' असल्याचं सांगितलं आहे. पण तिच्या फोटोंखाली आलेल्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होतं की, चाहत्यांना त्यांच्या नात्याची कबुली अजूनही अपेक्षित आहे.