Marathi News> मनोरंजन
Advertisement

विराट-अनुष्का पाठोपाठ बॉलिवूडची 'ही' हॉट अभिनेत्री झाली अलिबागकर; केली 2 कोटींची गुंतवणूक

Bollywoood's Hot Actress Become Alibagkar : बॉलिवूडची ही अभिनेत्री अमिताभ बच्चन यांच्या लग्झरी अपार्टमेंटमध्ये आधी भाडेतत्वावर रहायची आणि आता ती त्यांची शेजारी झाली आहे. 

विराट-अनुष्का पाठोपाठ बॉलिवूडची 'ही' हॉट अभिनेत्री झाली अलिबागकर; केली 2 कोटींची गुंतवणूक

Kriti Sanon Bought Property in Alibaug: बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनननं आतापर्यंत तिच्या करिअरमध्ये अनेक वेगवेगळ्या धाटनीच्या भूमिका साकारल्या आहेत. नेहमीच चित्रपटांमुळे चर्चेत राहणारी क्रिती आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे क्रितीनं अलिबागमध्ये एक प्लॉट खरेदी केला आहे. दरम्यान, असं म्हटलं जातं की आता ती अमिताभ बच्चन यांची शेजारी झाली आहे. 

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, क्रितीनं 2000 स्केअर फीटचा प्लॉट खरेदी केला आहे. रिपोर्ट्सनुासर, 2000 स्केअर फीटचा हा प्लॉट खरेदी करण्यासाठी क्रितीनं तब्बल 2.25 कोटी मोजले आहेत. प्लॉटच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या वेळी क्रितीचे वडील राहुल सेनन तिथे उपस्थित होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अलिबागमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी गुंतवणूक केली आहे. या कलाकारांच्या यादीत अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानसारख्या सेलिब्रिटींची नावं आहेत. मुंबईच्या जवळ आणि समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या या ठिकाणी जायला प्रत्येकाला आवडतं. अनेकदा लोक इथे विकेंडला किंवा काही दिवसांची सुट्टी काढून फिरायला जातात. 

पहिल्या गुंतवणूकीविषयी बोलताना क्रिती सेनन म्हणाली, 'मी खूप आनंदी आहे की आता अलीबागमधील ती जमिन माझी आहे. बऱ्याच काळापासून माझं लक्ष हे अलिबागकडे लागलं आहे. मला अशीच जमिन खरेदी करायची होती जिथे शांती आणि प्रायव्हसी मिळेल. माझ्या वडिलांना देखील या गुंतवणूकीमुळे आनंद झाला आहे. पुढे क्रितीनं सांगितलं की हे ठिकाण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे ठिकाण मांडवा जेट्टीपासून फक्त 20 मिनिटांच्या अंतरावर अलीबागच्या अगदी मध्येच आहे.'

क्रितीनं ज्या ठिकाणी ही जमिन घेतली आहे. त्यानंतर ती अमिताभ बच्चन यांची शेजारी झाली आहे. अमिताभ यांनी देखील याच परिसरात 1000 स्केअर फीटचा एक प्लॉट खरेदी केला आहे. अलीबागमध्ये जागा घेण्याआधी क्रितीनं बंगळुरुमध्ये एक कमर्शियल स्पेस आणि गोव्यात एक व्हिला खरेदी केला होता. 

हेही वाचा : Anant - Radhika Wedding LIVE: अनंत- राधिकाच्या लग्नाचा मुहूर्त काय? आजच्या दिवसभरातील कार्यक्रमांचं वेळापत्रक समोर

क्रितीच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर तिनं तेलगु चित्रपट ‘नेनोक्कडीने’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तर बॉलिवूडमध्ये तिनं ‘हीरोपंती’ या चित्रपटातून पदार्पण केलं. क्रितीनं ‘लुका छुप्पी’, ‘बरेली की बर्फी’, ‘आदिपुरुष’, ‘मिमि’, ‘भेडिया’,’शहजादा’, ‘दिलवाले’, ‘राबता’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. तर मिमिसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 

Read More