Marathi News> मनोरंजन
Advertisement

KRK म्हणाला, 'द बिग बुल'चा रिव्ह्यू करणार नाही.... अभिषेकने दिलेलं उत्तर कौतुकास्पद

केआरकेला अभिषेकचं दोन शब्दात उत्तर 

KRK म्हणाला, 'द बिग बुल'चा रिव्ह्यू करणार नाही.... अभिषेकने दिलेलं उत्तर कौतुकास्पद

मुंबई : अभिषेक बच्चनचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'द बिग बुल' असं या नव्या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचं लहान वर्जन हंसल मेहताच्या 'स्कॅम 1992' या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळालं. कारण या दोन्हीची गोष्ट ही स्टॉक मार्केटमध्ये गोंधळ घालणाऱ्या हर्षद मेहताच्या जीवनावर आधारित आहे. फॅन्स, ट्रोल्स आणि केकेआर सारखे लोक यावर चर्चा करत आहेत. केआरकेने याबाबत एक वेगळाच स्टँड घेतला असून अभिषेक बच्चनने मजेशीर उत्तर दिलं आहे. 

केआरकेने एक ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये केआरके लिहितो की, आज 7.30 वाजत तुम्ही ''द बिग बुल'' पाहू शकता. ऑल द बेस्ट म्हणत अभिषेक बच्चन, अजय देवगन, कुमार मंगत, आनंद पंडित यांना टॅग केलं आहे. मी हा सिनेमा पाहणारही नाही आणि रिव्ह्यू ही करणार नाही. अस या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

fallbacks

यावर अभिनेता अभिषेक बच्चनने मस्त उत्तर दिलं आहे. या उत्तराचं सगळीकडे कौतुक होत आहे. अनेकांनी अभिषेकच्या या उत्तराला पसंत केलं आहे. लोक म्हणतात की,'काही न बोलता, बरंच काही बोलून गेलास. गुरू... '

केआरकेने अभिषेक बच्चनच्या प्रेमाखातर हा सिनेमा न बघण्याचा निर्णय घेतला आहे. केआरके अनेक बॉलिवूड सिनेमाचं रिव्ह्यू करत असतात. अगदी शाहरूख, सलमान आणि प्रियांका यांच्यावरही केआरकेने टिप्पणी केली आहे. केआरके याला अनेक सिनेमे आवडले नाहीत त्यावर त्याने स्पष्टपणे टिप्पणी केली आहे. 

Read More