Marathi News> मनोरंजन
Advertisement

घटस्फोटानंतर अर्जुन कपूरसोबत अफेअरच्या चर्चा; आता डेटिंग अ‍ॅपच्या भरवश्यावर कुशा कपिला!

Kusha Kapila On Finding Love On Dating App : कुशा कपिलानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डेटिंग अ‍ॅपवर प्रेमाच्या शोधात असण्यावर वक्तव्य केलं आहे. 

घटस्फोटानंतर अर्जुन कपूरसोबत अफेअरच्या चर्चा; आता डेटिंग अ‍ॅपच्या भरवश्यावर कुशा कपिला!

Kusha Kapila On Finding Love On Dating App : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री कुशा कपिला ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी कुशा तिच्या आणि पती झोरावर सिंह अहलूवालियासोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. तर कधी तिचं नाव अर्जुन कपूरसोबत जोडण्यात आलं त्यामुळे. आता या सगळ्यात कुशा कपिलाला एका मुलाखतीत ती डेटिंग अॅपवर आहे की नाही या विषयी विचारण्यात आलं आहे. त्यावर कुशानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

कुशानं ही मुलाखत मॅशेबल इंडियाला दिली होती. या मुलाखतीत कुशानं सांगितलं की तिनं कधीच डेटिंग अॅपचा वापर केला नाही. कारण माझी ट्रेन खूप आधीच सुटली होती. जेव्हा डेटिंग अॅपचं कल्चर आलं, तेव्हा मी सिंगल नव्हते. त्यामुळे ना मी आधी कधी डेटिंग अॅपवर होते ना आता आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कुशानं सांगितलं की इंडस्ट्रीमध्ये तिचे जितके मित्र किंवा ओळखीचे आहेत. सगळेच तिच्याशी सन्मानानं बोलतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला घेऊन तिला थोडं वेगळंच वाटतं. 

कुशाने आपण फार विचित्र व्यक्ती असल्याचं म्हटलं आहे. यामुळे आपल्याला सहज संवादाचा अनुभव येत नाही असं ती सांगते. एकतर माझ्यासोबत असं कोणी करत देखील नाही आणि मी खरं सांगते. कुशानं पुढे सांगितलं की लोकं तिच्याशी खूप आदरानं बोलतात आणि तिला ते आवडतं. याशिवाय कुशा म्हणाली की जास्त लोकं हे तिच्याकडे कोणत्यातरी मुद्द्यावर तिचं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी येतात. त्याशिवाय इंडस्ट्रीमधील तिच्या सहकलाकारंना ती खूप चांगल्या पद्धतीनं ओळखते असं तिनं सांगितलं. 

कुशाच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर 2017 मध्ये तिनं झोरावर सिंग अहलूवालियाशी लग्न केलं होतं. मात्र, 2023 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. झोरावरशी घटस्फोट झाल्यानंतर तिचं नाव अर्जुन कपूरशी जोडण्यात आलं होतं. पण कधीच त्या दोघांनी या चर्चांवर किंवा नात्याला दुजोरा दिलेला नाही. 

हेही वाचा : 'ये रिश्ता क्या...' च्या 'कार्तिक'ला हार्ट अटॅक? अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

कुशाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती कॉमेडी सीरिज लाइफ हिल गईंमध्ये दिसली होती. या सीरिजमध्ये तिच्यासोबत दिव्येंदू शर्मा देखील दिसला होता. या सीरिजमध्ये दोन भाऊ-बहीण हे आजोबांच्या प्रॉपर्टीवरून भांडताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत अनेक सेलिब्रिटी देखील दिसले. 

Read More