Marathi News> मनोरंजन
Advertisement

आज एका मुलीची आई असणाऱ्या मॉडेलचा 24 व्या वर्षीचं मोठा विक्रम

300 मिलीयन फॉलोअर्स मिळवणारी ती पहिली महिला ठरली आहे

आज एका मुलीची आई असणाऱ्या  मॉडेलचा 24 व्या वर्षीचं मोठा विक्रम

मुंबई : अमेरिकेची रिअॅलिटी टीव्ही स्टार कायली जेनर जगभरात प्रसिद्ध आहे. लहान मुलं तिला आवडतात. आजकाल कायली जेनर तिची दुसरी गर्भधारणा एन्जॉय करत आहे. ती लवकरच आई होणार आहे. दरम्यान, या अभिनेत्रीने आणखी एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

खरंतर, वयाच्या 24 व्या वर्षी, कायली जेनरने इंस्टाग्रामवर 300 मिलीयन फॉलोअर्सचा आकडा पार करून एक नवीन विक्रम केला आहे. 300 मिलीयन फॉलोअर्स मिळवणारी ती पहिली महिला ठरली आहे. इतकंच नाही तर कायली जेनर इंस्टाग्रामवर तिसरी सर्वाधिक फॉलो असणारी व्यक्तिमत्त्व बनली आहे. पहिल्या क्रमांकावर अधिकृत Instagram अकांऊन्ट आहे.

तिचे फॉलोअर्स 460 दशलक्ष आहेत. त्याचबरोबर, पोर्तुगालचा फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याला 389 मिलीयन युजर्स फॉलो करतात. काइली जेनरनंतर फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि अभिनेता ड्वेन 'द रॉक' जॉन्सन यांचा क्रमांक लागतो. काइली जेनरनंतर एरियाना ग्रॅन्डे ही सर्वाधिक फॉलो केलेली महिला पॉप सिंगर आहे.

कायली जेनरने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी कायली जेनर लिप किट नावाची स्वतःची कॉस्मेटिक कंपनी सुरू केली हे फार कमी लोकांना माहीत आहे. काही दिलसातच काईलीचे प्रोडक्ट लोकप्रिय झाले आणि कायली जेनरने त्याचं नाव कायली कॉस्मेटिक्स ठेवलं. या व्यवसायाने ती आज कोट्यधीश झाली आहे. काईली फक्त 20 वर्षांची होती जेव्हा तिने तिच्या मुलीला, स्टॉर्मीला जन्म दिला. तिने आपली गर्भधारणा देखील गुप्त ठेवली होती.

Read More