Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 : छोट्या पडद्यावरील मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी' गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. असं म्हटलं जातं की या मालिकेचा पुढचा भाग अर्थात सीझन 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या मालिकेची शूटिंग सुरू झाली आहे आणि तिनं असा दावा केला आहे. त्यासोबत स्मृती इराणी या कमबॅक करणार आहेत. त्यांनी या मालिकेच्या पहिल्या भागात तुलसी ही भूमिका साकारली होती. या भूमिकेतून त्या घरा-घरात पोहोचल्या होत्या. आता या मालिकेच्या पुढच्या भागासाठी त्या शूटिंग सुरु असल्याचं म्हटलं जात असून सेटवर Z+ सिक्योरिटी आहे.
'इंडिया फोरम' च्या रिपोर्टनुसार, 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' या मालिकेचं शूटिंग सुरु झालं आहे. तर सेटवर सुरक्षा प्रोटोकॉल पाहता मोबाईल फोनची टॅपिंग होणार आहे. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, अमर उपाध्याय, स्मृती इराणी आणि एकता कपूर यांचे मोबाईल वगळता इतर सगळ्यांचे फोन हे टॅप होणार. सगळ्यांना सेटवर मोबाईल वापरण्यास मनाई आहे.
सोर्सनं हा देखील दावा केला की स्मृती ईरानी या Z+ सिक्योरिटी सोबत या मालिकेचं शूटिंग करत आहेत आणि सेटवर असलेल्या सगळ्या लोकांना सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन करावं लागेल. पहिला भाग हा 2000 मध्ये सुरु झाला होता आणि 2008 मध्ये ही मालिका संपली. तुलसी विरानीच्या रूपात स्मृती इराणी यांनी केलेल्या अभिनयाची आजही प्रेक्षकांमध्ये चर्चा होते आणि त्यांना यासाठी अनेक अवॉर्ड्स मिळाले आहेत.
हेही वाचा : ओशोंचं प्रवचन ऐकण्यासाठी 10 रुपयाचं तिकिट घ्यायचे जावेद अख्तर! म्हणाले, 'त्याच हॉटेलमध्ये जायचो आणि 22 दिवस...'
स्मृती इराणी 2003 मध्ये भारतीय जनता पार्टीचा भाग झाल्या. इथूनच त्यांच्या राजकारणातील करिअरची सुरुवात झाली. 2014 ते 2016 पर्यंत त्या केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री होत्या. त्यानंतर 2016 ते 2021 त्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री झाल्या. त्यांनी 2017 ते 2018 पर्यंत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम केलं. 2019 मध्ये त्यांची केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री म्हणून नियुक्ती झाली. तर 2024 पर्यंत महिला आणि बाल विकास मंत्री राहिल्या आणि 2022 ते 2024 केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री देखील होत्या.