Marathi News> मनोरंजन
Advertisement

अजिंक्य पोस्टींगला जाण्याचा निर्णय बदलेलं का?

विक्रम शहिद झाल्यामुळे सगळ्यांच्याच पायाखाली जमिन सरकली 

अजिंक्य पोस्टींगला जाण्याचा निर्णय बदलेलं का?

मुंबई : लागिरं झालं जी या मालिकेला दिवसेंदिवस वेगळे वळण मिळत आहे. अज्या आणि शितलीच्या लग्नानंतर आता या मालिकेत आणखी एक ट्विस्ट आला आहे. या मालिकेतील पात्रांना आणि प्रेक्षकांना मोठा धक्का बसणार आहे. आणि ही मालिका पुन्हा एकदा मोठं वळण घेणार आहे. मालिकेतील सगळ्याच पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं पण यातील एक पात्र कायमचा निरोप घेणार आहे. 

या मालिकेतील अज्या आणि त्याचे मित्र विक्या आणि राहुल्या हे तिन्ही पात्र अतिशय लोकप्रिय आहेत. या तिघांची मैत्री अतिशय लोकप्रिय आहे. पण आता या त्रिकूटातून आता एक मित्र कायमचा सोडून जाणार आहे. विक्रमच पोस्टिंग झालं असताना त्याच्या शहिद झाल्याची बातमी समोर येते. आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. 


लग्न झाल्यानंतर आता अजिंक्यला पोस्टिंगचं पात्र आलं आहे. त्याच्या कामावर रुजू होण्याच्या सर्व लगबगीमध्ये सर्वाना एक धक्कादायक बातमी समोर येते, ती म्हणजे विक्रम शहीद झाल्याची. या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसतो, अजिंक्यतर पुरता हादरून जातो. विक्रमचं शहिद झाल्यामुळे अजिंक्यच्या डोक्यात विचित्र विचारांचं काहूर माजतं. त्याच पोस्टिंगच्या तयारीत असलेलं पाऊल अचानक अडखळतं. नुकतंच झालेलं लग्न, नवीन संसार त्याच्यावर असलेली शीतलच्या जबाबदारी या सगळ्या गोष्टींचा विचार करून, शीतलचा विचार करुन पोस्टिंगसाठी जावं की नको हा पेच त्याच्यासमोर निर्माण होतो.

Read More