Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनयनंतर स्वानंदीचे ही चित्रपटसृष्टीत पर्दापण...

 मराठी चित्रपटसृष्टीतील एक लाडक नाव म्हणजे लक्ष्या.

अभिनयनंतर स्वानंदीचे ही चित्रपटसृष्टीत पर्दापण...

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील एक लाडक नाव म्हणजे लक्ष्या. आपल्या अभिनयाने आणि विशिष्ट शैलीने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या कॉमेडीने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. मात्र जगातून त्यांची अचानक एक्सिट झाली. आणि हसणाऱ्या रसिकांवर दुःखाची छाया पसरली. 

लक्ष्याच्या पावलावर पाऊल

लक्ष्याच्या पावलावर पाऊल ठेवत गेल्या वर्षी लक्ष्याचा मुलगा अभिनय याने 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून या चंदेरी दुनियेत पर्दापण केले. आता त्याच्या कुटुंबातील अजून एक व्यक्ती रसिकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. ती म्हणजे लक्ष्याची लाडकी लेक स्वानंदी. किशोर बेळेकर दिग्दर्शित रिस्पेक्ट या चित्रपटातून ती चित्रपटसृष्टीत पर्दापण करत आहे.

असा असेल चित्रपट

हा चित्रपट म्हणजे सात महिलांची गोष्ट आहे. या सातपैकी एक महिला स्वानंदी साकारत आहे. एका पाठोपाठ एक दोन्ही मुलांच्या चित्रपटसृष्टीतील पर्दापणाबद्दल प्रिया बर्डे अत्यंत खूश आहेत. 

fallbacks

Read More