Lata Mangeshkar Death Anniversary : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आज 6 फेब्रुवारी 2023 पहिला स्मृतीदिन...त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दीदींच्या आवाज अजून साक्षात सरस्वती देवीचा अधिवास...त्यांनी अनेक भाषांमध्ये हजारो अविस्मरणीय गाणी गायली. आठ दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत त्यांनी 36 भाषांमध्ये 50,000 हून अधिक गाणी गायली आहेत. आजही त्यांचा अविस्मरणीय ठेवा रसिकांनी जपून ठेवला आहे. स्वर्गीय आवाजानं सारं विश्व मंत्रमुग्ध करणाऱ्या लतादीदींना एक मारण्याचा प्रयत्न झाला होता. या वेदनादायी क्षणाबद्दल एकदा स्वत: त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं.
वयाच्या 33 वर्षांतील म्हणजे 1963 ही धक्कादायक घटना आहे. लतादीदींना कोणीतरी स्लो पॉटयझन देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं. या वेदनादायी क्षणाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या होत्या की, त्यावेळी त्यांना अंथरुणावरून उठताही येत नव्हतं. जवळपास 3 महिने त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. त्यांना स्वतःहून काही करता येत नव्हतं..अगदी चालताही येतं नव्हतं. हे महिने दीदींसोबत मंगेशकर कुटुंबासाठी खूप कठीण काळ होता. आजही त्या आठवणीने मन सुन्न व्हायला होतं. त्यामुळे मंगेशकर कुटुंबातील सदस्य या आठवणीवर बोलण्यास टाळतात.
एवढी मोठी घटना पण आजपर्यंत पण दीदींना कोणी मारण्याचा प्रयत्न केला होता आणि कोणी त्यांना जहर दिलं होतं हे कळू शकलं नाही. त्याबाबत आजही कुठलाही ठोस पुराव्या नाही. त्यामुळे त्यावेळी पोलिसात मंगेशकर कुटुंबाला पोलिसात तक्रार करता आली नव्हती. आजपर्यंत हे धक्कादायक आणि संतापजनक कृत्य करणाऱ्या व्यक्तीचं नाव गुलदस्त्यात आहे.
The voice, the aura, the simplicity and the smile…
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) March 28, 2022
Lives on.. pic.twitter.com/cm2QsKnLCL
ही घटना वाऱ्यासारखी जगभरात पसरली होती. दीदींना मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्याच वेळी मीडिया रिपोर्ट्सनुसार ही गोष्ट समोर आली की विषबाधेमुळे दीदींचा आवाज गेला होता. पण ही निव्वळ अफवा होती. कारण खुद्द लतादिदींनी या बातमीचं खंडन केलं होतं. विषबाधेमुळे आवाज कधीच गेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
हळूहळू दीदींची तब्येत ठीक होतं होती. अशात हेमंत कुमार यांनी त्यांनी स्टुडिओत रेकॉर्डिंगसाठी बोलवलं. ते स्वत: दीदींना आईची परवानगी घेऊन स्टुडिओमध्ये घेऊन गेले. जर त्यांना रेकॉर्डिंग करताना दीदींना काही त्रास झाला तर लगेच घरी घेऊन येईल असं वचन त्यांनी दीदींच्या आईंना दिलं होतं. पण त्या स्टुडिओमध्ये आल्यात रेकॉर्डिंगही झालं आणि कही दीप जल कही दिल हे गाणं रिकार्ड झालं. अशाप्रकार दीदी या घटनेतून सावरल्या आणि पुन्हा गाण्यास सुरु केली.